(जावली/ अजिंक्य आढाव ) – वाखरी ता फलटण गावची दि १ते ५ मे रोजी साजरी होणारी यात्रा गावातील दोन्ही गटाचा वाद न मिटल्याने पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार असुन प्रांत अधिकाऱ्यांनी यात्रा काळात गावांमध्ये जमावबंदीच्या आदेश लागू केले असून त्यानुसार गावात यात्रे वेळी दोन्ही गटात भांडणे होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच गावातील दोन्ही गट हे एकामेकांचे ऐकण्याचे स्थितीत नसल्याने देवाच्या हळदीचा कार्यक्रम,देवाचे लग्नसोहळा या कार्यक्रमास इतर लोकांना मनाई करण्यात येत असल्याने देवाचा छबीना काढण्यास मनाई केली आहे.सदर कालावधीमध्ये मौजे वाखरी गावांमध्ये कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम घेता येणार नसल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
मागील वर्षी यात्रा कमिटी व गावचे सरपंच व इतर ग्रामस्थ यांच्या वांरवार बैठका घेऊन दोन्ही गटांमध्ये सम्झौता करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केलेला होता मात्र दोन्ही गटात समझौता न झाल्यामुळे गावात यात्रेवेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून देवांचे धार्मिक कार्यक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रम होवू दिलें नव्हते.
उपविभागीय अधिकारी फलटण ,उपविभागीय पोलिस अधिकारी , तहसीलदार फलटण, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या समवेत वारंवार बैठका घेऊन सुद्धा यांमधून कोणताही समझोता होतं नसल्याने प्रांताधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत .