हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

आचारसंहिता काळात गावयात्रेत कुस्ती, तमाशा आयोजन,वर्गणी या वरुन वाद टाळावेत – पोलिस निरीक्षक सुनील महाडिक

(जावली/अजिंक्य आढाव)- सध्या लोकसभा निवडणूकीमुळे आचारसंहिता लागू आहेत. अशाच आपल्या तालुक्यातील ‌ग्रामदैवताच्या यात्रा सुरू झालेले आहेत परंतु अनेक गावामध्ये गट तट आहेत .अनेक वर्षा पासुन यात्रा कमिटी नियुक्तीची पद्धत कोणतीही विहित पद्धत नाही. गावचे ग्रामदैवताचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे कोणतेही ट्रस्ट रजिस्टर नाही .त्यामुळे यात्रेचे आयोजन नेमके कोणी करायचे यात्रेची वर्गणी कशी गोळा करायची यावरून मतभेद आहेत .कायदेशीर प्रक्रिया करताना कोणालाही ट्रस्ट असल्याशिवाय वर्गणी घेता येत नाही अनेक वर्षापासून सदर ठिकाणी कोणतेही वाद निर्माण होत नव्हते .परंपरागत पद्धतीने वर्गणी गोळा केली जायची परंतु आता लोकांच्या मध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि ज्या वेळेस लोकांना कायद्याची माहिती होती त्यावेळेस पोलीस व महसूल प्रशासनाला कायद्याप्रमाणेच काम करावे लागते .परंपरा आणि कायदेशीर मार्ग यामध्ये निवड करायची झाल्यास प्रशासनाला कायदेशीर मार्गाची निवड करावी लागते .ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे यात्रा कमिटीचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे याबाबत स्पष्ट उल्लेख नाही मग कायदेशीर यात्रा करायच्या असतील तर ट्रस्ट असावे लागते परंतु याची इतक्या वर्षे सर्व लोक गुण्यागोविंदाने व एकमेकांना मानपान देऊन वागत असल्याने त्याची गरज भासली नव्हती. परंतु आता प्रत्येक देवस्थानचे ट्रस्ट होणे गरजेचे आहे कायदेशीरपणे बोलायचे झाले तर ट्रस्ट असल्याशिवाय एक पैसाही कुणालाही वर्गणी गोळा करता येत नाही .हाच नियन महापुरुष जयंती साठी लागू आहे आणि याच्यातूनच काही गावांमध्ये संघर्ष होत आहे.

पोलीस डिपार्टमेंट कडे याप्रकारे वाद आल्यानंतर कायदा सुव्यवस्था पोलिसांना सांभाळायची असल्याने कोणत्याही भांडण तंटा किंवा दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊ नये प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता 144 प्रमाणे आदेश काढावा लागतो.पोलिस प्रशासना कडून सर्वांना विनंती आहे आचरसंहिता सुरु आहे. कोणीही मानपान वर्गणी कुस्ती तमाशा आयोजन या वरून वाद करू नये वाद झालेस राजकीय किनार मिळालेस परस्पर विरोधी गुन्हे दाखल होतात कोणताही गुन्हा होताना एक फिर्यादी एक अरोपी व गुन्हेचे कारण हे घटक लागतात बरेच वेळा गुन्ह्याचे कारण दिवाणी स्वरूपाचे असते त्यावरून वाद होतो वाद होणे हे मात्र फौजदारी मधे येते म्हणून पोलिस दिवाणी बाबतीत त्यांचा विषय नसताना मीटिंग घेतात परंतु नाही येकले तर गुन्हा दाखल करणे शिवाय पर्याय नसतो .यात्रा आयोजण हा सुद्धा दिवाणी विषय आहे पण त्यावरून निर्माण होणारे वाद केवळ गुन्हा नाही तर सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करतात म्हणजे सर्व सामान्य लोक यात्रेत वाद झालेस घाबरून जातात म्हणून असे वादात पोलिस ला सक्त कारवाई करावी लागते आणि भांडणारे नंतर कारवाई सामोरे जाऊन कायम कोर्ट चक्कर व प्रतिबंधक कारवाई चे प्रक्रियेत पुढील अनेक वर्ष अडकून जातात म्हणून सर्वांनी यात्रा गुणेगोविंदाने साजरे करा वर्षातून एकत्र येतो तर आदराने एकमेकांची चौकशी करा वाद उकरून काढू नका शेवटी यात्रे सारखे विषय पूर्वीपासून समाज आपुलकीने नांदवा म्हणून असतो वितुष्ट निर्माण होणेच कधीच नसतो आणि या उपरोक्ष जर वाद पोलिस स्टेशन पर्यंत आला तर कायदा आपले काम चोख करणार असल्याचे माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक साहेब यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!