(जावली/अजिंक्य आढाव)- महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारे कै.आनंदराव अर्जुन उगले (वय ५५) रा. उदमाईवाडी ता. इंदापूर जिल्हा पुणे यांचे अपघातात निधन झाले.
१९८४ पासून ग्रामीण भागातून हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली होती. याबरोबरच महाराष्ट्रातील यात्रा उत्सवांमध्ये सुप्रसिद्ध असणारे “जय भवानी हॉटेलचे” मालक आनंदराव उगले यांचे शिखर शिंगणापूर यात्रा आटपून झाल्यानंतर पुढील यात्रेसाठी जात असताना नातेपुते घाटात अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाला. पुसेगाव, पाली ,वीर ,आबापुरी मांढरदेवी ,शिखर शिंगणापूर, धुळोबा भिवाई, शिरसुफळ ,उदमाईवाडी तसेच कर्नाटक राज्यात आपला व्यवसायासाठी गेल्या अनेक दिवसांपासून परिचित असणारे कै. आनंदराव उगले यांचे निधन झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आपले व्यवसायाबरोबरच माणुसकीची नाळ जोडली गेली होती. यात्रा उत्सवासाठी सर्वत्र हाँटेल मोठ्या दिमाखात उभारणी केली जायचेच मात्र यंदा आनंदराव उगले यांचे निधन झाल्याने उगले कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.