(फलटण /प्रतिनिधी ): -फलटण तालुक्यातील सांगवी गावामध्ये भाजप ला आज मोठा धक्का बसला भाजप चे सांगवी गावचे पॅनल प्रमुख राहिलेले व २५ वर्ष सांगवी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन असलेले नरसिंग शिंदे (आबा) यांनी आज भारतीय जनता पार्टीतून राजे गटामध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला प्रवेश होण्याअगोदर काही काळ सदर बातमी खासदार गटाला समजल्यानंतर तातडीने खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी नरसिंग शिंदे यांच्या घरी भेट दिली काही काळ चर्चा झाल्यानंतर सुद्धा नरसिंग शिंदे आबा हे भाजपमधून राजे गटामध्ये सामील होण्यासाठी ठाम राहिले यामुळे सांगवी व सांगवी पंचक्रोशी मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार पडले नरसिंग शिंदे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये ही पंचक्रोशी मध्ये त्यांचा दबदबा होता यांच्या भाजप सोडचिठ्ठीने भाजपला सागवी परिसरामध्ये मोठा धक्का बसला आहे कारण त्यांच्याबरोबर सांगवी सोसायटीचे संचालक ढगु मोरे ,राजेंद्र शिंदे, राजाराम नाळे ,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमधून राजे गटामध्ये प्रवेश केला.
या प्रवेशाच्या वेळी नरसिंग शिंदे आबा यांना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमधून राजे गटामध्ये प्रवेश केला यावेळी श्रीराम कारखान्याचे संचालक पोपट जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांगदेव खरात, युवराज माने, जालिंदर जगताप ,सरपंच संतोष मोरे ,बापूराव मोरे ,माझी सरपंच किसन खरात ग्रामपंचायत सदस्य पोपट जाधव ,दादा करचे हजरत शेख इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते