हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

सुरवडीत भरदिवसा चोरी २० तोळे सोन्यावर डल्ला

 (फलटण/ प्रतिनिधी)सुरवडी ता. फलटण येथील भर दिवसा गावातील वस्तीत असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २० तोळे सोने व चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला या घटनेने सुरवडी परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अमोल विलासराव भोसले वय ४४ रा.सुरवडी ता फलटण यांनी दिलेल्या फिर्यादी व त्यांची पत्नी सह दि १६ रोजी सकाळी ११वाजता बँकेच्या कामा निमित्त फलटणला गेलो होतो दुपारी १:४५ वाजता माघारी आलो असता घरच्या लोखंडी गेटचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसले त्यानंतर घराच्या लोखंडी कपाटातील लाॅकर तोडुन सोन्याचे साडे एकोणवीस तोळे व चांदीच्या गणपती मूर्ती, निरंजन,ताट , असा ४ लाख १०हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे फिर्यादेत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!