(जावली/अजिंक्य आढाव)-या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असुन जवळपास अर्धे राज्य कोरडे पडले असुन फलटण पूर्व भागात जावली गावाला या पूर्व दुष्काळाच्या छळा कधी सोसाव्या लागल्या नाहीत परंतु या वर्षात पाणी टंचाई निर्माण झाली असून गावच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जावली गावचे कै.सोमा धोंडी बरकडे प्रतिष्ठान यांच्या वतीने आज दुष्काळजन्य परिस्थिती असताना गावाला पाण्याच्या टंचाई जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.अशा परिस्थिती श्री. ज्ञानदेव बरकडे कार्यकारी विशेष अधिकार सातारा जिल्हा बँक), भोलचंद बरकडे प्राथमिक शिक्षक, सयाजी बरकडे (माजी सरपंच/बागायतदार) या बंधुनी ग्रामस्थांची अडचण समजून घेऊन सामाजिक कार्य म्हणून मोठं पाऊल उचलले आहे.
फलटण पूर्व भागात नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे हे प्रतिष्ठान सध्या भीषण पाणीटंचाई जाणवतं असताना प्रतिष्ठानच्या वतीने जावली गावाला आज पासून टॅंकर व्दारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.
या वेळी जेष्ठ नेते तुकाराम बरकडे, ज्ञानदेव बरकडे, सयाजी बरकडे,ग्रामपंचायत सदस्य मोहन नाळे, ज्ञानदेव बुधावले, तंटामुक्त अध्यक्ष महादेव बरकडे, माध्यमिक शाळेचे शिक्षक वाघमोडे सर , शेवते, मल्हारी पोकळे गावातील तरुण मंडळी फैय्याज शेख, समीर आतार, सचिन मकर , गणेश मकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.