हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

यंदा जावली सिद्धनाथ यात्रा ३० एप्रिल ते 4 मे रोजी पर्यंत

दुष्काळ असल्याने पाणी टंचाई जाणवणार का...? भाविक भक्तांसाठी फिरते शौचालय उभारणार - देवस्थान ट्रस्ट जावली

(जावली/अजिंक्य आढाव) – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जावली ता फलटण येथील सिद्धनाथ यात्रा( 30  एप्रिल ते 4 मे ) पर्यंत या उत्सवासाठी दि.30 एप्रिल पासून सुरू होणार असून मंगळवार रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजे पर्यंत हळदी समारंभ  बुधवार 1 मे रोजी जोगेश्वरी आणि सिद्धनाथ यांचा विवाह दुपारी 1 ते 2 वाजता रिंगवणे येथे होणार गुरुवार दि.2 रोजी भाकड दिवस, शुक्रवार दि. 3 रोजी बकरी व बगाड, शनिवारी दि.4 रोजी पहाटे 4 वाजता श्री.सिद्धनाथ महाराज यांची छबीना अशा प्रकारे यात्रा होणार असून देवस्थान ट्रस्ट निंबाळकर व जावली ग्रामपंचायतच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दुष्काळी परिस्थिती असल्याने या वर्षी टॅंकर व्दारे पाणी पुरवठा होईल. तर वाहतूक व्यवस्था म्हणून मोकळा जागेत आपली वाहने पार्क करावी.

 

30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 ते 9 हळदी

1 मे रोजी लग्नसोहळा रिंगणे येथे दुपारी 1ते 2 वा

2 मे रोजी भाकड दिवस

3 मे रोजी बकरी,बगाड

4 श्री सिद्धिनाथ महाराज यांचा पालखी पहाटे 4वाजता गुलाल, छबिना

 

जावली सिद्धनाथ यात्रा फलटण पूर्व भागातील सर्वात मोठी असून कर्नाटक, मध्यप्रदेश या भागातील भाविक भक्त हजेरी लावतात.

बैठकी वेळी यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फिरते शौचालयची सोय , सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य विभागाच्या सुविधा देण्यात येणार असून पोलिस प्रशासनाही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

यात्रा कमिटी ची बैठक सिद्धनाथ मंदिरात आयोजित करण्यात आला होती. यावेळी आरोग्य अधिकारी  डॉ. तृप्ती मोरे , विभागाचे कर्मचारी ,  ट्रस्टचे व्यवस्थापक यादव , बरड सर्कल ज्ञानेश्वर  सोनवलकर, बरड  वितरणाचे सहाय्यक अभियंता दिग्विजय ठोंबरे, वायरमन निलेश कोकरे, जावली लायमन विशाल सोनवलकर पोलिस पाटील भरत मोरे, ग्रामसेवक व्हि.एन पवार, तलाठी विलास खाडे , जेष्ठ नेते तुकाराम बरकडे , माजी सरपंच सयाजी बरकडे, माऊली चवरे , नाथा साळुंखे, प्रविण साळुंखे, अमर पडर ,  शिवाजी साळुंखे, चेतन भोसले, मंदिरातील पुजारी, तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!