हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

सासकल येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क दौरा

(जावली/ अजिंक्य आढाव) : मौजे सासकल तालुका फलटण येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये जनसंपर्क दौऱ्यावर असून नुकतीच त्यांनी मौजे सासकल ता.फलटण येथे जनसंवाद दौऱ्या दरम्यान कार्यकर्त्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांची भेट घेऊन गावच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत असताना गावातील मुख्य समस्या, शेतकऱ्यांचे, तरुणांचे प्रश्न, रस्त्यांच्या समस्या, गायरानातील लोकवस्तीची समस्या, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग खोल्यांची समस्या जाणून घेतल्या. एस टी सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.

यावेळी शाळेच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक घोरपडे यांनी शाळेच्या समस्या मांडल्या. सासकल गावचे उप सरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव मुळीक,राष्ट्रीय समाज पक्षाच्या संगिता मुळीक,शिवाजी मुळीक, सर्जेराव मुळीक, ज्ञानेश्वर मुळीक,अस्मिता मुळीक,अजित मुळीक, मंगेश मुळीक,सागर मुळीक, चेतन मुळीक, सचिन फडतरे, सचिन मुळीक, संपत मुळीक,ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक,संदीप फडतरे, हणमंत फडतरे,देविदास चांगण, हरिभाऊ मुळीक, गोपीनाथ डांगे,भीमराव खुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!