(एल के सरतापे/म्हसवड ):- माढा लोकसभा मतदारसंघाची भाजपाकडून पहिल्या यादीत विद्यमान खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्याला जवळपास एक महिन्याचा कालावधी झाला या देशात प्रसिद्ध झालेला व शरदचंद्र पवार व पंतप्रधान मोदी,अमित शहा, उपमुख्यमंत्री फडणवीस व आ जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठेचा बनवलेल्या या माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघा पैकी पाच आमदार भाजपा व सहयोगी पक्षाचे असताना खा निंबाळकर यांना त्यांच्याच सहयोगी पक्षातून कडाडून होत असलेला विरोध मोडून काढण्यासाठी महिन्यापासून बैठका , चर्चा माढ्याच्या रणांगणावर आज हि सुरू असल्याने प्रचार कधी व का होत नाही भाजप खा निंबाळकर यांना उमेदवारीचा भरोसा नाही का ❓श्रीमंत रामराजे निंबाळकर व बंधू सह आ चव्हाण , मोहिते पाटील, रासपचे महादेव जानकर, उत्तम जानकर, कल्यानराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटीलची नाराजी दुर करण्यासाठी एक महिन घालवला तरी हाती गळाला फक्त केवळ उत्तम जानकर सापडले तर महादेवराव जानकर यांचा त्यांच्या मायभुमितून पत्ता कट करून दुसरीकडे दिली तरी हि स्वता उमेदवार निंबाळकर प्रचार का करत नाहीत दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, माण म्हसवड येथील अभयसिंह जगताप, शेकापाचे डॉ देशमुख, यापैकी उमेदवार कोण याकडेच लक्ष लागले असले.
तरी हि या तिन्ही इच्छूक शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी या सहा हि तालुक्यात बायका पोरासह प्रचारात उड्या घेतलेल्या दिसत आहे मात्र भाजपा व मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे, अजितदादा राष्ट्रवादी गटाचे असे सहा आमदार याप्रमाणे आ जयकुमार गोरे , आ सातपुते, आ रणजितसिंह मोहिते पाटील, , आ संजयमामा शिंदे हे भाजपाचे तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आ दिपक चव्हाण,आ बबनदादा शिंदे, हे भाजप प्रणित आमदारांन पैकी फक्त एकमेव माण खटावचे आ जयकुमार गोरे खटाव तालुक्यातून माजी आ दिलीप येळगांवकर यांना बरोबर घेत वाड्या वस्तीसह प्रत्येक गावात गावात प्रचाराचा धडाका उमेदवार नसताना मित्र प्रेम व पक्ष प्रेमापोटी सुरू आहे पायाला भिंगरी लावून एक मेव आमदार प्रचारात उमेदवारा शिवाय उतरलेले दिसत आहेत मात्र विद्यमान खासदार व माढ्याचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र प्रचार करत नसल्याने त्यांना उमेदवारी रद्द होणार तर नाही ना याची तर भिती वाटत नाही का माढा लोकसभा निवडणुकीचा केंद्र बिंदू आकलुजचा शिवरत्न व फलटणचा सरोज व्हीला ठरत असून या दोन्ही ठिकाणी फक्त भाजपा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करणारे एकत्र येत आहेत तर रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे रणजितसिंह मोहिते पाटील व अजितदादा राष्ट्रवादी गटाचे आ दिपक चव्हाण हे दोन आमदार सोडून बाकीचे आ जयकुमार गोरे, आ सातपुते, आ बबनदादा शिंदे, आ संजयमामा शिंदे यांनी माढ्यात लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर रणनीती ठरवण्यात आली मात्र ती कागदावरच खलबल होऊन पारडे जड झाल्याचे चित्र पहावयास मिळत असले तरी पाठीमागील विधानसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघातील आ.जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांचे पेक्षा अवघे ३०४३मताचे लीड दिले होते तर आ.संजयमामा शिंदे यांनी सर्वात जास्त म्हणजे ५४९४ मताचे लीड विरोधका पेक्षा बसले होते, सांगोल्याचे आ.शहाजीबापु पाटील यांनी तर केवळ ७६८ चे लिड घेत विरोधकाच्या निसटता पराभव केला तर माळशिरसचे आ.राम सातपुते यांनी विरोधी उमेदवारापेक्षा २५९०चे लिड दिले होतो या सर्वाच्या लीडची बेरीज केवळ ११,८९५ मताचे होते तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना १ लाख १६ हजार मताचे लिड एकट्या माळशिरस मधून दिले मग विचार करा या पाच आमदारांच्या विधानसभेचे लिड आणि मोहिते पाटील यांचे लोकसभेचे लिड यामुळेच भाजपने मोहिते पाटील यांचा धसका जबरदस्त घेतला असल्याने प्रचाराचा नारळच फुटाने झाला आहे मोहिते पाटील यांची माढा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात स्वतःची २०,००० हजार मते व हक्काची वेगळी मते कोणी हि नाकारु शकत नाही कोणी किती हि पाय आपटो, दबाव टाको मोहिते पाटील यांना आता कोणीच रोखू शकत नाही त्यात मोहिते पाटील यांना फलटणच्या निंबाळकर राजे घरांण्याचे पाठबळ लाभल्याने पाडव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यावर सत्ताधारी गटाच्या पायाखालची वाळू सरकणार असेच चित्र सध्या माढ्याच्या रणांगणात दिसत आहे
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवारीची गुढी कोणाची..?
भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी भाजपने घोषित केल्याने गत निवडणुकीत १ लाख १६ हजाराचे लिड देणार्या मोहिते पाटील यांना डावलून व विचारात न घेता निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील कुटुंबासह रामराजे नाईक निंबाळकर कुंटुबात हि नाराजी उफाळून आली कधी
माढा मतदार संघातून उमेदवारीसाठी धैर्यशील मोहिते-पाटील आग्रही होते.तर कधी संजिवराजे तर कधी अभयसिंह जगताप , महादेव जानकर तर कधी शेकापाचे देशमुख आग्रही होते जानकरांचा माझ्यातील पता कट करून परभणीच्या मैदानात टाकला तर संजिवराजे यांना जबरदस्तीने शांत केले उर्वरित धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रवेश करुन उमेदवारी देणार कि राष्ट्रवादी पक्षाचे युवकाचे आयडाॅल अभयसिंह जगताप या दोघा पैकी उद्या उमेदवारीची गुढीपाडव्याच्या साडे तिन मुहूर्तांवर माढ्यात थोरले पवार साहेब आयात उमेदवाराला संधी देवून गुढी उभारणार की निष्ठावंताची गुढी उभारणार याकडे लक्ष लागले आहे.