(जावली/अजिंक्य आढाव) – लोकसभा 2024 इलेक्शन अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या सूचना प्रमाणे लोकसभा 2024 इलेक्शन अनुषंगाने जास्तीत जास्त अवैध धंद्यांवर कारवाई करणे बाबत आदेश मिळाले.
आज रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदवले रोड स्वाती मंगल कार्यालय समोर लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने नाकाबंदी चालू असताना एम एच 11 बी आर 1125 या मोटरसायकल वरून दोन इसम प्लॅस्टिकच्या पोत्यात काहीतरी घेऊन येत असताना दिसल्याने त्यांच्यावर संशय बळवल्याने त्यांना थांबऊन त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन दहिवडी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 71 हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरचे दोन्ही आरोपी हे राहणार देवापुर, तालुका माण, जिल्हा सातारा येथील असून त्यांची नावे वैभव बाबुराव बाबर आणि अनिकेत नंदकुमार कांबळे अशी आहेत.
सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी कामकाज केले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहाय्यक फौजदार अरुण दुबळे, पोलीस हवालदार विठ्ठल विरकर, पोलीस हवालदार बापू खांडेकर,पोलीस नाईक रवींद्र खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार ,पोलीस कॉन्स्टेबल सागर लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट , महिला पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती कर्चे कारवाई वेळी सहभागी झाले.