हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

माढयाचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होतिल अशी चर्चा

(जावली/अजिंक्य आढाव) – माढा लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विजय होऊन खासदार झालेले रणजीत सिंह निंबाळकर यांनी मतदार संघातील प्रलंबित कामे करून ती पूर्ण देखील केली फलटण लोणंद – रेल्वे फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग फलटण बारामती रेल्वे मार्ग निरा देवघर प्रकल्पातील कालव्यांच्या कामाला सुरुवात धोम बलकवडी कालवे चार माही वरून आठ माहिती केले नाही. नाईकबोमवाडी येथे एमआयडीसी मंजूर फलटणला आरटीओ ऑफिस , फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय अशी अनेक कामे केल्यामुळे खासदार रणजितसिंह सिंह नाईक निंबाळकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय होऊन पुन्हा एकदा खासदार होतील अशी चर्चा फलटण परिसरात सुरू आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडून आल्यानंतर लगेच 40 दिवसात फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण पूर्ण केले. फलटण बारामती यासाठी प्रयत्न करून बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली आहे फलटण बारामती रेल्वेचे दिनांक दहा फेब्रुवारी 2024 रोजी इन्स्पेक्शन करण्यात आले आहे त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
नीरा देवगन धरणाच्या कालव्यांचे उर्वरित काम त्वरित मार्गी लावण्यासाठी खासदारांनी निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय जलसंपदा मंत्री राजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे. त्यानुसार नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास 3967 कोटी 83 लाख रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने 17 जानेवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काळ व्यक्ती निरा देवघर प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्देश दिलेले आहेत देवघर सिंचन प्रकल्प कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याचा दृष्टीने केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हवाई पाहणी करावी अशी मागणी खासदारांनी निंबाळकर यांनी केली आहे.त्यानुसार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्री सेखा व त्यांनी निरा देवघर प्रकल्प कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेची हवाई पाहणी केली. त्यानंतर दोन्ही प्रकल्प मार्गी लागले. फलटण शहरातील पालखी मार्ग व शुशोभीकरणासाठी 75 कोटी रुपये निधी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडी ऑफिसचे अभियंता यांनी खासदार निधीसह यांच्यासह वीस फेब्रुवारी 2024 रोजी फलटण शहरातील पालखी मार्गाचे इन्स्पेक्शन केले तसेच नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत फलटण नगरपरिषद जिल्हा सातारा करिता रक्कम रुपये 15.45 कोटी निधीला खासदार अरविंद सिंह यांच्या प्रकल्पातून मंजुरी देण्यात आली आहे.

फलटण शहर हे रेल्वे मार्ग व राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसित करण्याचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने माढा मतदारसंघात प्रत्येक रस्ते विकसित करण्यात आले आहेत.
रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळेच माढा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा खासदार होतील अशी चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!