हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मोहिते पाटील यांचे बंड थंड झाल्यास राष्ट्रवादी ला पर्याय कोणता..? माढयात तुतारी ला कधी मिळणार वाजंत्री..?

(जावली/अजिंक्य आढाव) – माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू आहेत तरी एकीकडे मोहिते पाटील यांचे बंड थंड करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना मुंबईला बोलवून घेतले होते त्यामुळे मोहिते पाटील हे युटर्न घेतला.तर राष्ट्रवादीला पर्याय काय असावं सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांना या निवडणुकीसाठी चांगलाच गळ घातला आहे. मोहिते पाटील जर या ठिकाणी लढण्यास तयार झाली तर तसा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अवघड नाही त्यामुळे भाजपने मोहिते पाटील यांच्या बंडाची चांगलीच धास्ती घेतलीच दिसून येत आहे.मोहिते पाटील समर्थकांचा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध कायम आहे.

उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आणखी न काही दिवस बाकी आहेत. भाजपची पंगा घेण्याची संपूर्ण तयारी राष्ट्रवादी मोहिते पाटील यांच्या माध्यमातून केली आहेत. तर माढयाचे मोहिते पाटील उमेदवार राहिले तर ही निवडणूक चुरशीचे अटीतटीची होणार असल्याची सांगण्यात येत आहे.

सध्या तरी आ. रणजीत सिंह मोहिते पाटील वगळता मोहिते पाटील कुटुंबीय निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहेत.पवार गट जागा बदलून घेणार की त्यांच्याकडे आलेले दुसरे पर्याय पुढे आणणार यावरही आता विचारमंथन सुरू झाले आहे.या मध्ये राष्ट्रवादीला संजीव राजे नाईक निंबाळकर , अनिकेत देशमुख, नारायण पाटील असे अनेक पर्याय आहेत मात्र त्यांना निवडून येण्या पर्यंतचे निकष कितपत लागू होतात हे अद्याप सांगता येणार नसल्याचे बोलले जात आहे.कदाचित राष्ट्रवादीही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देऊ शकते असाही पर्याय समोर आणला जात आहे आमदार रणजितसिंह पाटील यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपची थेट फारकत घेणे मोहिते पाटील यांना शक्य वाटत नाही आ रणजितसिंह मोहिते पाटील यांना निवडणूक लढवायची असेल तर मोहिते पाटील कुटुंबीयांना पुन्हा एकदा फूट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कदाचित धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत असेही या निमित्ताने बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!