(फलटण/ प्रतिनिधी)- फलटण ग्रामीण पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या उर्फ राकेश संपत निंभोरे वय 28 वर्ष राहणार सात सर्कल साखरवाडी याच्यावर शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे तसेच मालमत्तेविरुद्धचे जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीची साखरवाडी भागात दहशत आहे.
सदर आरोपी काही महिन्यापूर्वीच कुणाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त होऊन बाहेर आलेला आहे. तरीसुद्धा त्याच्या छोट्या-मोठ्या कारवाया सुरू होत्या. सदर आरोपी विरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांनी तडीपारचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत प्रांताधिकारी फलटण यांना पाठवण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडावे म्हणून माननीय प्रांताधिकारी श्री सचिन ढोले यांनी सदर आरोपीला सहा महिन्यासाठी तडीपार सोलापूर पुणे ग्रामीण व सातारा जिल्ह्यातून केलेले आहे. आज सदर आदेशाची आरोपीवर बजावणी करण्यात आली. सदर आरोपी सहा महिने या भागात दिसून आल्यास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला किंवा डायरेक्ट 112 ला कळवावे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल माननीय पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस हवालदार श्रीनाथ कदम पोलीस नाईक नितीन चतुरे पोलीस अंमलदार हनुमंत दडस श्रीकांत खरात सुजित मेंगावडे अमोल जगदाळे यांनी केलेली आहे