हि बातमी ईतर भाषेत वाचा
देश विदेश

शिवानी फडतरे यांची राज्य आणि केंद्र शासनाच्या अँग्री कल्चर फिल्ड ऑफिसर पदी निवड ; एकाच वेळी दोन्ही परिक्षेत घवघवीत यश संपादन

(विडणी/ सतिश कर्वे ) जाधववाडी ता.फलटण येथिल शिवानी अनिल फडतरे हिने सरळ सेवा परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्य शासनाच्या अँग्रीकल्चर असिस्टंट तर केद्र शासनाच्या अँग्रीकल्चर फिल्ड आँफिसर वर्ग १ या पदी यश संपादन करुन फलटण तालुक्यातील एकाच वेळी राज्य व केंद्र शासनाच्या परिक्षेत निवड झालेली एकमेव महिला असल्याचा बहुमान पटकविला आहे.

फलटण तालुक्यातील जाधववाडी सारखे ग्रामीण भागातील शिवानी फडतरे हिचे घरची आर्थिक परस्थिती हालाखीचे असताना वडीलांचे मायेचे छञ आधार हरपलेला शिवानी शाळेत हुशार असल्याने आईने काबाड कष्ट करुन घरचा प्रपंचा जबाबदारी सांभाळत अनेक चढ उतार पाहात शिवानीच्या शिक्षणात व्यत्यय न आणता तिचे शिक्षण सुरु ठेवले शिवानीने सुध्दा आपल्या जिद्द चिकाटी आत्मविश्वास खडतर परिश्रम घेत परस्थितीशी दोन हात करत शिवानीने प्राथमिक शिक्षण जि,प.शाळा गिरवी माध्यमिक शिक्षण छञपती शिवाजी विद्यालय गिरवी उच्यमाध्यमिक शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण ग्रँज्युशन अँग्रीकल्चर महाविद्यालय पुणे येथे घेऊन स्पर्धा परिक्षेचा सेल्फ स्टडी करुन राज्य व केद्र शासनाच्या सरळ सेवा परिक्षेत शिवानीने उज्वल असे यश प्राप्त करुन राज्य शासनाच्या अँग्रीकल्चर असिस्टंट तर केद्र शासनाच्या अँग्रीकल्चर फिल्ड आँफिसर वर्ग १ या पदी निवड झाली.

या यशाबद्दल फलटण तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक मिञमंडळी नातेवाईकांनी शुभेच्छाच कौतुकाचे वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!