हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

दहिवडीत पाठलाग करुन पकडली चोरटी दारु ; 75 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त

(जावली/ अजिंक्य आढाव)- दहिवडी पोलीस स्टेशन मधील वाहतूक पोलीस अंमलदार हे दैनंदिन वाहतूक नियमन कर्तव्यकरिता पिंगळी चौक येथे असताना एक संशयित इसम भरधाव वेगाने मोटरसायकल क्रमांक MH 11 DK 3184 वरून टाकीवर हिरव्या रंगाच्या पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असताना दिसल्याने त्यास हात करून थांबवण्याचा इशारा केला असता सदर इसमाने गाडी न थांबवता जोरात पुढे निघून गेल्यामुळे वाहतूक पोलिस अंमलदार सागर लोखंडे आणि सहदेव साबळे यांनी जवळपास तीन किलोमीटर पाठलाग करून सदर इसमास पकडले असता त्यांनी त्याचे नाव सागर महादेव जाधव राहणार महिमानगड असे सांगितले.

त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये पाहणी केली असता अवैध दारू मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता दहिवडी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्याच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 75,000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर , अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम ,उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पो. कॉ.सहदेव साबळे पो. कॉ. सागर लोखंडे ,पो. कॉन्स्टेबल रामचंद्र फड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन वावरे हे करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!