(जावली/ अजिंक्य आढाव) – दहिवडी पोलिस स्टेशन हद्दीततील स्वप्निल संजय जाधव रा शिंगणापुर ता.माण.जि.सातारा जिल्ह्यातील दहिवडी व इतर पोलिस स्टेशनला चोरी, व जबरी चोरी, शासकीय कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच पोलिस समक्ष मारामारी करणे असे गुन्हे दाखल झाले असलेने व त्याचे पासून लोकांचे जिवितास भय ,धोका निर्माण होवून सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहचविण्याची शक्यता असल्याने त्यांचे विरुद्ध दहिवडी पोलिस स्टेशन कडुन त्यास हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी माण – खटाव यांचेकडे पाठविण्यात आला होता.
नमुद प्रस्तावावरुन मा. उज्वला गाडेकर उपविभागीय दंडाधिकारी माण – खटाव यांनी स्वप्निल जाधव रा. शिंगणापूर ता. माण जि.सातारा यास खटाव व माण तालुक्यातुन ०४ महिन्यांसाठी हद्दपार केले असल्याबाबत आदेश पारीत केला आहे.
सदरची कारवाई मा.समीर शेख पोलिस अधीक्षक सातारा , मा.आंचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक सातारा,मा. अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलिस स्टेशन यांनी केले आहे.