हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

गिरवी येथील चिमुरड्या ज्ञानदा कदम हिचे गीता परीक्षांत घवघवीत यश संपादन

(जावली/अजिंक्य आढाव) – ज्ञानदा सचिन कदम या चिमुकल्या ताईने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी भगवदगीता हा संपुर्ण ग्रंथ ३ वर्षात संस्कृतमध्ये कंठस्थ करून रविवारी दि. ३१ मार्च रोजी गीता परिवाराने घेतलेल्या गीताव्रती परीक्षांमध्ये पुर्ण १८ अध्याय ७०० श्लोक  ६०० गुणां पैकी ५८९ गुण मिळवून गीताव्रती ही पदवी मिळवली आहे.

अतिशय  लहान वयात भगवद्गीता पाठांतर असणारी व संस्कृत विषयाचे ज्ञान असणारी ज्ञानदा कदम ही गिरवी गावाची कन्या आहे . ती संस्कृत भाषा सुद्धा खूप छान शिकत आहे आणि इतरांना सुद्धा शिकण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

ज्ञानदा कदम या मुलीने या पूर्वीसुद्धा सायकलिंग, रॉक क्लाइंबिंग मध्ये यश मिळवले आहे ती मुलींना एक संदेश देते आहे मुलींनो शस्त्र आणि शास्त्र हाती घ्या शस्त्र हाती घेतलेले तर मनगट बळकट होईल आणि शास्त्र हाती घेतले तर मन बळकट होईल मन आणि मनगट बळकट असेल कोणा समोरही अबला म्हणून झुकावे लागणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!