हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

माढ्यात कमळ छाटण्यासाठी उमेदवार कोणी हि असो तुतारीच वाजवायची म्हसवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात शशिकांत शिंदेचीं गर्जना

(म्हसवड /प्रतिनिधी) : माढा हा राष्ट्रवादी पक्षाचा विशेषतः शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा बाल्लेकिल्ला साहेबांची तुतारीच वाजणार आहे कौतुक करतो अभयचे सर्व जण पक्ष सोडून जात असताना हा युवक ८४ वर्षांच्या योद्ध्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहुन माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी धडपडून केंद्रातील व राज्यातील भ्रष्टाचारी सरकारवर निर्भीडपणे मते मांडणारे अभयसिंह जगताप त्यांचे राजकीय भवितव्य घडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी पक्ष घेणार आहे हुकूमशाहीचे राज्य येऊ नये, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येऊ नये, यासाठी हा निकाराचा लढा  देण्यासाठी माढ्याच्या मतदारांनी माढ्यातुन कमळ छाटण्यासाठी तयारीला लागा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूख मैदान तोफ असलेली माजी पालकमंत्री आ शशिकांत शिंदे यांनी म्हसवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाजार तळावर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिंदे बोलत होते.

पुरोगामी विचाराचे अभ्यास क माणूस सभोवतालची परिस्थिती माहिती असणारे नेतृत्व अभयसिंह जगताप लोकसभेत गेला पाहिजे शिंदे साहेब आज सर्व यंत्रणा दहशती खाली काम करत आहे कोणत्याही भ्रष्टाचार वर कोणी बोलत नाही बोलला तर त्याला आत टाकले जाते , शेतकर्यांची भयानक अवस्था आहे शेतकर्यांचे कोणत्याही मालाला भाव नाही खताचे दर वाढले, गॅस, पेट्रोल वाढले, छत्रपती यांचेबरोबर मुस्लिम होते तुम्ही छत्रपती ना मानतात मुस्लिमांचा द्वेश करु नका येणाऱ्या निवडणुकीत माढ्यातील तुतारी वाजली पाहिजे असे शिवसेनेचे नेते व सिने अभिनेते किरण माने यांनी मत व्यक्त केले

काल गुरुवारी म्हसवड नगरपालिकेच्या समोरील बाजार तळावर भव्य असा अभयसिंह जगताप यांना माढ्याची उमेदवारी मिळावी यासाठी माढ्याच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी सांयकाळी सात वाजता मेळावा घेण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुख मैदान तोफ आ शशिकांत शिंदे, माण खटावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, अभिजित पाटील (पंढरपूर), सिनेअभिनेते व शिवसेनेचे नेते किरण माने, कविता म्हेत्रे, प्रतिभा शिंदे, संतोष वारे (करमाळा), विशाल जाधव, डॉ. महेश माने, दिलीप तुपे, युवराज बनगर, सुनील सावंत (करमाळा), महेश गुरव, महादेव मासाळ, विलासराव माने, संजय निवगुंडे,किशोर सोनवणे, भाग्यश्री पाटील (कुडुवाडी), राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष परेश व्होरा, राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रकांत केवटे, इंजि. बाळासाहेब माने, बाळासाहेब आटपाडकर, काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, प्रशांत वीरकर, विजय जगताप, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले , राज्यात व देशात  हुकूमशाहीचे राज्य येऊ नये, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येऊ नये, महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला जाऊ नये, यासाठीचा हा लढा आहे. मी शब्द देतो माढ्याची जबाबदारी अभयसिंह यांना देण्यासाठी पवार साहेबांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करणार सहा महिन्या पासून कष्टाने चिकाटीने माढ्या पक्षाची धैयधोरणे पोहचवण्याचे काम करणारे नेतृत्व माढ्यात उभे राहत आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे ताकत उभी माढ्यातील मतदारांनी केली आहे हा नुसता कार्यकर्ता मेळावा नसुन उद्याचा तुतारीचा विजय मेळावा होईल असे शिंदे यांनी आवाहन केले
यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले खोट बोलायचं पण ते रेटून बोलून दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची वृत्ती या लोकसभा निवडणुकीत उघडी पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीमागे उभे करुन आपल्या हक्काच्या माणूसालाच माढ्यातुन उमेदवारी मिळावी यासाठी अभयदादा यांचेवर प्रेम करणारे माळशिरस, करमाळा , सांगोला माढा , फलटण , कोरेगांव, खटाव व माण मधील हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला आले आहेत हे या मेळाव्याच्या उपस्थिती वरुन दिसत आहे एक अभ्यासू निर्भिड पुरोगामी विचार जोपासणारे दादांना लोकसभेत पाठवायचे आहे , लबाडीचे राजकारण संपवण्यासाठी व न केलेल्या कामाचे श्रेय घेणारे घरी बसवण्यासाठी माढ्यात तुतारीच वाजवायची असे देशमुख म्हणाले.

 

यावेळी माढा लोकसभेचे इच्छूक उमेदवार अभयसिंह जगताप यांनी चौफेर फटकेबाजी करत जगताप म्हणाले राष्ट्रवादीची उमेदवारी मला मिळो वा कोणाला हि मिळो शरदचंद्र पवार साहेब सांगतील ते धोरण, ठरवून माढ्यातील घरा घरावर राष्ट्रवादीचे तोरण.बांधायचे आहे स्वताला बलाढ्य पक्ष समजणार्या भाजप येवढा मोठा पक्ष समजतो तर इतर पक्षाचे नेते का फोडतात, तुमचा मोठा पक्ष आहे तर लहान लहान पक्ष का फोडतोय, काँग्रेस पक्षाचे अकाऊंट सिल का करतात, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक का करतात एवढा मोठा पक्ष आसून का भित आहे मित्रानो कारण त्यांच्या कडे इडी, सीबीआय,भारताचे कर्ज घेऊन फरार झालेल्या उद्योगपतीकडुन करोडोंचे चेक चालतात, तरी हि भाजप का भितो मित्रांनो मग तुम्ही आम्ही का भितो हि निवडून शेवटची आहे पुन्हा निवडणूक होईल का नाही हे सांगता येणार नाही देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच होत आहे कालावधी संपून हि चार चार वर्षे झाली तरी निवडणूक होत नाही देश मानसिक गुलामगिरी कडे नेमण्याचे षडयंत्र आहे त्यांना चारशे खासदार का निवडणूक आणायचं आहे त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान बदलायचे आहे त्यासाठी मित्रानो माढ्यात शरदचंद्र पवार साहेब उभे आहेत असे समजून उमेदवार मी असो वा इतर कोणी असो त्याला निवडून माढ्यातुन कमळ छाटून विजयाची तुतारी वाजवण्यासाठी तयारी ठेवून माढ्याच्य विजयाचा गुलाल ७ मे ला नाथ नगरीत उधळायचा आहे.

महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताचा उदोगधंदा गुजरात ला नेहला, मणिपूर जळत होते, महिलांना उघडे करून मारत होते त्यावेळी हे मंत्री खासदार आमदार गप्पा का होते, ज्यांना शाळा काढायची माहीती नाही त्यानी आपल्या माढा मतदारसंघातील एकमेव मेडिकल कॉलेज होतं त्या देशमुखांना इडी लावून तुंरगात टाकले, फलटणच्या एकाला लुबाडून त्याची इडी लावून तुरुंगात टाकले म्हसवड मध्ये हि विनाकारण पाच लोकाच्यावर इंनकम टॅक्सच्या चौकशा लावल्या गेल्या हे उदोग बंद करण्यासाठी माढ्यातुन यावेळी कमळ छटायचे आहे असे अभयसिंह जगताप यांनी सांगितले.

यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटिल म्हणाले पाच वर्षात मतदारसंघात काम काय हे त्यांनी स्टेजवर येवून सांवे राम मंदिर बांधण्यासाठी आमचा विरोध नाही मीपण एक लाख रुपये देणगी दिली आहे मंदिर बांधकामासाठी एकुण ५ हजार ३४० कोटी जमा झाले त्यापैकी मंदिर बांधकाम १८ शे कोटी खर्च मग बाकीचे ३२ शे कोटी गेले कोठे , छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे काय झाले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे झालं काय, महाराष्ट्रातून २ लाख ८८ हजार महिला मुली गायब झाल्या हे वार आपल्या घरापर्यंत येवू शकतं १६ शे ६० आत्महत्या झाल्या, १६ उद्योगपतीचे कर्ज माफ होते मग शेतकर्यांचे का होत नाही अशी चौफेर फटकेबाजी अभयसिंह जगताप यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!