हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

विजया साठी झटणार कि काटा काढणार..? माढयात महाविकास आघाडीला उमेदवार मिळनां..?

महादेव जानकर यांच्या धक्क्याने पवार साहेब कोणाकडे तुतारी देणार

(एल के सरतापे /म्हसवड) – माढा हा असा लोकसभा मतदारसंघ प्रसिद्ध झाला आहे तो देशाच्या नकाशावर गाजत आहे तो शरदचंद्र पवार यांच्या मुळे हा मतदारसंघ शरदचंद्र पवार व भाजपाने विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, खा रणजितसिंह निंबाळकर व आ जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठेचा बनवत विद्यमान खा रणजितसिंह निंबाळकर यांना विजय करण्यासाठी भाजपाने आपल्याच संयोगी पक्षातील व भाजपाचे नेते यांचेवर अखेरचे अस्त्र बाहेर काढत मोहिते पाटील व रामराजे नाईक निंबाळकर यांचा कडवा विरोध मोडीत काढत यश जरी भाजपाला मिळवले असले तरी निंबाळकर यांच्या विजयासाठी राजे व मोहिते झटणार कि काटा काढण्यासाठी तुतारी वाजवणार कोण ? रासपाचे महादेव जानकर यांनी माढ्याच्या गावा गावात पदयात्रा, संघर्ष यात्रा, घोंगडी बैठका घेत माढ्याच्या रणांगणात थयथयाट करून निंबाळकर यांना विजयाचा आडसर बनलेले जानकर आता माढ्या ऐवजी परभणी कि बारामतीत विजयासाठी थयथयाट करणार याकडे लक्ष लागले असले तरी शेवटी शरदचंद्र पवार नक्की अभयसिंह जगताप,कि अनिकेत देशमुख कि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देऊन पक्ष प्रवेश करुन भाजपा उमेदवार याचे पुढे तगडे आवाहन पवार साहेब उभे करणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

मीमाढा लोकसभा मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून देश पातळीवर चर्चेत आहे २००९ मध्ये हा मतदार संघ नव्याने अस्तित्वात आला त्या वेळी पहिली उमेदवारी स्वता राष्ट्रवादी मधून शरदचंद्र पवार यांनी घेतली त्यांच्या विरोधात सोलापुरचे सुभाष देशमुख यांना भाजपाने उमेदवारी दिली होती या पहिल्या लढतीत शरदचंद्र पवार यांनी ५,३०,५९६ मते मिळावून माढ्यात पहिल्या विजयाचा श्रीगणेशा केला होता माढ्यातील भाजपाचे प्रतिस्पर्धी होते सोलापूरचे सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांना २,१६,१३७ मते मिळाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी ३ लाख १४ हजाराच्या फरकाने विजय मिळवला होता यावेळी माढ्याचे भूमिपुत्र असलेले व ५ लाखाहून अधिक धनगर समाज या मतदारसंघात असताना दुषकाळी माण तालुक्यातील म्हसवड नजिकच्या पळसावडे येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना केवळ ९८,९४६ मते मिळाली, बसपाचे राहुल सरवदे यांना १६,७३७ मते मिळाली तर माण मधील दुसरे लोकसभेचे उमेदवार माजी आ सदाशिवराव पोळ यांचे बंधू डॉ. माधव पोळ हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून १३,०६९ मते मिळाली या निवडणुकीत जानकर व पोळ हे दोनच उमेदवार माढ्याच्या भुमितील होते बाकी सर्व माढ्याच्या बाहेरील उमेदवार होते तरी हि राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सर्वाची डिपॉझिट जप्त केली होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली तर भाजपाने पराभवाच्या भितीने शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली यावेळी हि दुसऱ्यांदा राष्ट्रवादीने विजय मिळवत विजयसिंह मोहिते पाटील यांनी ४,८९,९८९ मते घेऊन सदाभाऊ खोत यांना ४,६४,६४५ मते मिळून खोतांचे पराभव झाला
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणचे भाजपाचे आ जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असलेले रणजितसिंह निंबाळकर यांचा एका रात्रीत भाजपा प्रवेश घेऊन माढ्याच्या रणांगणात उमेदवार म्हणून उतरवून गोरे यांनी स्वता प्रचाराची धुरा सांभाळत माढ्याचे गणित जुळवून आणत होते तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्याला भाजपात घेऊन निवडणुक लढवली भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांनी ५,८६,३१४ मताधिक्य घेत राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांना ५,००५६० मते मिळाली राष्ट्रवादीचे शिंदे यांचा भाजपाचे निंबाळकर यांनी निसटता ८६ हजार मतानी पराभव केला या लढतीत तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे विजय मोरे यांनी ५१ हजार ५३६ मते घेतली होती या मतदारसंघात दलित समाजातील मते ४ लाखाच्या दरम्यान असताना हि वंचितने केवळ ५१ हजार मते मिळवली होती.

२०२४ च्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने पुन्हा विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी त्याचे मित्र माण खटावचे आ जयकुमार गोरे यांनी थेट दिल्ली दरबारातून उमेदवारी जाहीर केल्याने भाजपा मधील मोहिते पाटील परिवार व सहयोगी असलेली राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर परिवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे माढ्याचे पदाधिकारी यांनी कडाडून रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करत उमेदवार बदलण्यासंबधी मागणी केली तर भाजपाचे दुसरे सहयोगी आमदार व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढ्यातुन लढणार म्हणून प्रचार सुरू केला रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूज भेट केल्याने गोरे निंबाळकर जोडगोळीने माढ्यात भाजपाचे पाच आमदार व पदाधिकारी एकत्र करत रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करणाऱ्याना ताकत दाखवून दिली भाजपाचे अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना बरोबर घेत मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र यश आले नाही तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे बरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांचे बरोबर दोन बैठका घेऊन रणजितसिंह निंबाळकर यांचे वरील नाराजी दुर केली मग ती मनाने झाली कि तिने हे निवडणुकी नंतर समजतात आसले तरी आज हि राजे गटाचे कार्यकर्ते रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करत असून हि कार्यकर्तीच्या नाराजीचा फायदा शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारास बसणार आहे त्यात विजयसिंह मोहिते पाटील यांनी कालच शेवटच्या क्षणी तुतारी हाती घेऊन शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी गटात धैर्यशील मोहिते पाटील लवकरच प्रवेश करणार असले तरी शरदचंद्र पवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हातात तुतारी देणार कि राष्ट्रवादीचे महाराष्ट्र सरचिटणीस असलेले व गेले वर्षभर माढा लोकसभेच्या रणांगणात लाखोच्या संखेने कार्यक्रम घेऊन, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी पैठणीचे खेळ, होम मिनिस्टर, रक्तदान शिबिरे घेत लोकांच्या मनामनात घर केलेले अभयसिंह जगताप यांच्या हातात तुतारी देणार,पवार साहेब नक्की जगताप कि मोहिते पाटील यापैकी कोणाच्या हातात तुतारी देवून माढ्याचे गणित सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर माण फलटणच्या जोडगोळी पुढे शरदचंद्र पवार कोण कोणती आवाहन उभी करणार, भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस, अजितदादा, कोणती अस्त्र बाहेर काढणार याकडे देशाचे लक्ष या माढ्याकडे लागले आहे माढ्याच्या निकालावर विधानसभेची रणनिती ठरणार असून सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा व सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभेची गणिते या लोकसभेच्या निकालावर सुटणार असल्याची चर्चा सुरू असून शरदचंद्र पवार माढ्याची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात प्रवेश देवून देणार कि पक्षासाठी काम करणारे अभयसिंह जगताप यांच्या हातात तुतारी देणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!