हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

तब्बल १४ वर्ष घरफोडी प्रकरणातील फरारी आरोपीला लोणंद पोलिसांनी केले जेरबंद

(जावली/अजिंक्य आढाव) तब्बल १४ वर्ष घरफोडीच्या गुन्हयातील फरार आरोपींस लोणंद पोलिसांनी केले जेरबंद चोच्या उर्फ शुभम राज्या शिंदे वय ३८ रा‌. शेळके वस्ती लोणंद ता. खंडाळा.जि. सातारा यांने गुन्हा केल्यापासून मागील १४ वर्ष फरार होता.

संशयित आरोपी चोच्या उर्फ शुभम राज्या शिंदे हा त्याचे घरी दि. २६ रोजी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि सुशिल भोसले यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिसांच्या पथकाने शेळके वस्ती लोणंद येथे त्यांचे घराचे आजुबाजुला सापळा रचला सकाळी ८ वा सुमारास फरारी आरोपी चोच्या उर्फ शुभम शिंदे हा घरी आला त्यावेळी पथकातील अंमलदार यांनी एकाच वेळी कारवाई करुन अचानक त्याचे घरी झडप टाकली व चोच्या उर्फ शुभम शिंदे याला ताब्यात घेतला .त्याला लोणंद पोलिस स्टेशन येथे आणुन त्याचे अटकेची कारवाई केली व त्यानंतर आरोपींस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.फलटण न्यायालया समोर हजर केले असता त्याची १४ दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर झालीं आहे.

सदरची कारवाई ही श्री समीर शेख पोलिस अधीक्षक सातारा मा.आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिस स्टेशनचे , प्रभारी अधिकारी सुशिल भोसले पोलिस निरीक्षक, पो.हवा संतोष नाळे,पो.हवा.नितीन भोसले, पो ना.बापु मदने, पोकाॅ विठ्ठल काळे पो.काॅ अभिजित घनवट यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!