(जावली/ अजिंक्य आढाव) मौजे वाठार निंबाळकर ता फलटण गावच्या हद्दीत वाठार फाट्याजवळ पुसेगाव रोडवर दि. 25 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास अपघातात आयशर टेम्पो च्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.
आयशर टेम्पो क्र. एम. एच. 14 जी.डी. 5630 वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून समोरुन ठोकर दिल्याने दुचाकीस्वार गणेश सोनबा मदने वय 25 रा. वाठार निंबाळकर ता फलटण यांच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या बाबत महावीर बापू मदने यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.