(जावली/अजिंक्य आढाव ) दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी श्रीरंग रोमन राहणार कोळेवाडी यांनी त्यांची मोटरसायकल चोरीस गेले बाबत तक्रार दाखल केलेली होती.
या अनुषंगाने गुन्ह्याच्या तपासात कोरेगाव ,पुसेगाव दहिवडी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच सर्व भंगार दुकानदारांकडे चौकशी करून आणि तांत्रिक बाबींचा उपयोग करून सदर मोटरसायकल चोरी ही अनिल जाधव आणि अतुल निकम या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून मोटर सायकलचे सुट्टे पार्ट आणि चोरी करताना वापरलेला चार चाकी टेम्पो जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलेले आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सातारा , अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, पोलीस नाईक सचिन वावरे, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाढवे सहभागी होत मोठी कारवाई केली असल्याचे सांगितले.