(जावली /अजिंक्य आढाव )फलटण शहरात मोबाईल हॅडसेट चोरणारी टोळीस शहर पोलिसांन कडून जेरबंद करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की गेले अनेक दिवसांपासून शहरात मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या दि. १२ रोजी डेक्कन चौक फलटण येथे युसुफ मन्सूर महात वय ५२ रा. कोळकी , फलटण हे चालत जात असताना, तीन अनोळखी आरोपींनी दुचाकीवर येऊन त्यांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन गेले. या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे गुन्ह्याचे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून तिघा संशयतांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 3 लाख 2 हजार रुपये किमतींचे 12 मोबाईल व एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत फलटण शहर पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. संशयित निलेश अनिल जाधव , (वय 21) निखिल तुकाराम गदाई( वय 19) , मंगेश संजय गंगावणे ( वय 21), रा. सोमवार पेठ यांना अटक केली आहे. या तिघांना कौशल्य पूर्ण तपास करुन अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, मा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नितीन शिंदे, स. पो.फौ. संतोष कदम पो.ह चंद्रकांत धापते, सचिन जगताप, पो.शि सचिन पाटोळे, काकसो कर्ण , जितेंद्र टिके , स्वप्निल खराडे यांनी केली आहे.
या अनुषंगाने, सर्व नागरिकांना मोबाईल फोन चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास तक्रार पोलीस ठाण्यात तत्काळ द्यावी.