(एल के सरतापे/ म्हसवड) :- माढ्याची उमेदवारी आपल्याच मित्राला मिळावी यासाठी दिल्ली दरबारी केलेला दौरा आ जयकुमार गोरे दौरा यशस्वी करून एका दगडात पाच पांडवाचा पहिल्या तहातच करून सर्व विरोधकांना वरचढ ठरलेल्या आ जयकुमार गोरे व व खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पहिली लढाई जिंकली आसली तरी निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार कोणाला उमेदवारी देणार माढ्यात जिवाचे रान करून राष्ट्रवादी माढ्याच्या घरा घरात पोहचवण्याचे काम करणारे अभयसिंह जगताप या घरच्या व हक्काच्या माणसाला मिळणार कि पवार साहेब रासपचे महादेव जानकर, मोहीते पाटील, कि संजिवराजे यापैकी कोण रणजितसिंह यांचे विरोधात कोण उमेदवार पवार साहेब देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेले दोन महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात उमेदवारी वरुन भाजपा व मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजितदादा गट) , रासपा, या सत्ताधारी गटातच उमेदवारी वरुनच मोठी रस्सीखेच लागून चुरस लागली माजी सभापती रामराजे यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जर तर ची भाषा केली होती तर अकलूजचे सोलापूर जिल्हा भाजपाचे नेते धवलसिंह मोहीते पाटील यांनी हि आत्ता माघार नाही असे म्हणत प्रचार सुरू केला होता तर चौथ्या घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी तर माढ्यात सहा महिन्यापासून यात्रा, रॅली, मेळावे, सभा घेऊन विजय माझाच असे म्हणत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अभयसिंह यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने भयमुक्त माढ्यासाठी निर्भय अभयसिंह जगतापच परिवर्तन घडवून शकतात यासाठी त्यांचाच उमेदवारी द्यावी यासाठी अनेकांनी स्वताच्या रक्ताने वरिष्ठांना पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे भाजपाने रणजितसिंह ना. निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने रामराजे, संजिवराजे अकलूज चे धवलसिंह व रासपचे जानकर हे तिन्ही इच्छूक उमेदवार निंबाळकर यांचा प्रचार करणार कि शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारास पाठिंबा देणार कि उमेदवारी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आसले तर निंबाळकर गोरे जोडगोळीने भाजपाच्या वरिष्ठांमध्ये विश्वास निर्माण करुन तिकीट मिळवल्याने माढ्यात पुन्हा सलामीची जोडगोळी सरस ठरत अनेकांना त्रिफळाचीत करुन पहिली व महत्त्वाची लढाई तर जिंकल्याची चर्चा मात्र माढ्यात सुरू आहे.
भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली.या मध्ये गेले अनेक दिवसांपासून या माढ्याच्या रणसंग्रामात विद्यमान भाजपाचे खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांचे विरोधात भाजपाचा महाराष्ट्रातील मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचे नेते माजी सभापती रामराजे ना निंबाळकर व माण खटावचे आ जयकुमार गोरे, खा निंबाळकर यांचे वैर सर्वाना माहित असून एक हि संधी हे त्रिकुट एकमेकावर कोणत्याही कारणावरून आरोप प्रत्यारोप अगदी खालच्या स्तरापर्यंत करून एकप्रकारे सातारा जिल्ह्याचा ऐन उन्हाळ्यात पारा चढताना दिसत आहे तर काही मंडळी हि केवळ करमणूक म्हणून याकडे पहाताना दिसत आहे.
माढा मतदारसंघातील जागा नक्की भाजपाला जाणार कि राष्ट्रवादी (अजित पवार गट) की रासपा यामध्ये नक्की कोणाकडे जाणार? भाजपाकडे गेली तर विद्यमान खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांना जाणार कि सोलापूर जिल्हा अध्यक्ष व अकलूजच्या धवलसिंह मोहीते पाटील यांचे पैकी कोणाकडे याची उत्सुकता सातारा, सांगलीसह सोलापूर, पूणे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले होते. अखेर माढ्याच्या उमेदवारी मागे आ जयकुमार गोरे व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वरिष्ठांकरवी उमेदवारी मिळवत अजितदादा गटाचे रामराजे ना निंबाळकर यांना व भाजपाचे अकलूजच्या धवलसिंह मोहीते पाटील यांना जोरदार धक्का बसला तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष व त्या पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हि माढ्याची जागा आपल्याला मिळावी यासाठी केंद्रीय मंत्र्यापासून महाराष्ट्रातील अनेक भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या त्याच बरोबर राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांचे कडेही उमेदवारीची मागणी केली होती मात्र भाजपाने विरोध डावलून गोरे- निंबाळकर द्वयीला दिल्ली दरबारीसुद्धा गोरे यांनी आपले वजन रणजितसिंह यांच्यासाठी पणाला लावले होते. त्यामुळे रामराजे व मोहिते पाटील यांचा विरोध डावलून पक्षश्रेष्ठीनी रणजितसिंहना उमेदवारी दिल्याने आमदार जयकुमार गोरे यांचे भाजपमध्ये राजकीय वजन वाढल्याची चर्चा मात्र जोरदार सुरू झाली आहे. रणजितसिंह यांच्या प्रचाराच्या नियोजनाची एकहाती धुरा आमदार जयकुमार गोरे यांच्या हातात असल्याने रणजितसिंह यांच्या विजयासाठी आमदार गोरे सर्व विरोधकांना एकटे भारी पडले असले तरी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे विरोधात कोण राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप कि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यापैकी पवार साहेब नक्की कोणाला उमेदवारी देणार कि धवलसिंह मोहीते पाटील व संजिवराजे यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देवून यापैकी कोणाला उमेदवारी शरदचंद्र पवार देणार यावरच माढ्याचे गणित सुटणार आहे ऐवढे मात्र नक्की.