(जावली/ अजिंक्य आढाव) महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णा उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबई येथील सोहळ्यात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार समाज कल्याण विभागाचे सचिव डॉ सुमंत भंगी समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आमदार किशोर जोरंगेवार आमदार भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते फलटण येथील कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले हे गेले अनेक वर्षापासून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अंध अपंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्रशिक्षण त्यांची निवास व्यवस्था त्यांना लघु उद्योगाचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहता येईल नोकरीची संधी उपलब्ध होतील यासाठी सतत प्रयत्नशील आहेत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची सण २०२०/२१या वर्षातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे १५ हजार रुपये रोख , सन्मान चिन्ह , सन्मानपत्र,शाल, श्रीफळ असे स्वरूप आहे.