(कोळकी/प्रतिनिधी) – विविध शासकीय विभागात पद भरती मध्ये निवड झालेल्या युवक युवतींचा लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने सत्कार करुन सामाजिक बांधिलकी जोपासली
शासनाच्या वतीने जि.प.शाळा शिक्षक भरती स्पर्धा परिक्षा घेण्यात आली होती.यामध्ये विडणी गावातील प्रतिभा मारुती नाळे माधुरी प्रमोद गाढवे सुभाष हरिभाऊ निकाळजे यांची शिक्षक पदी निवड झाली.तर डॉ.दिपाली नामदेव जगताप हिने पीएचडी करुन सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल या सर्व यशस्वी युवक युवतींचा लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करणेत आला.
यावेळी श्रीराम कारखानाचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे पतसंस्थेच्या चेअरमन डॉ.सुचिता शेंडे शोभा नाळे सुवर्णा नाळे लता ननावरे हणमंतराव अभंग विकास जाधव विश्वास परकाळे सुशांत जगताप किशोर ननावरे प्रमोद गाढवे सागर जगताप विशाल जगताप आदीची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो – लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने सत्कार करणेत आलेले युवक युवती (छाया सतिश कर्वे)