हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन

(फलटण/ प्रतिनिधी) – फलटणच्या राजकारण व समाजकारणातील स्पष्ट व सडेतोड व्यक्तिमत्व, खा. शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष तुकाराम शिंदे तथा भाऊ यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (बुधवार) सकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात सात मुली,एक मुलगा सुन नातवंडे असा मोठा परिवार असून, त्यांचे पार्थिव उद्या गुरुवार दि 14 रोजी सकाळी 8 ते 10 जिद्द बंगला फलटण येथे अंतिम दर्शनासाठी ठेवणार असून त्यांचेवर मुळ गावी शिंदेवाडी येथे सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!