हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

जागतिक महिला दिन व महाशिवरात्री चे औचित्य साधत एकदंताय सामाजिक संस्थांयाच्या वतीने विविध उपक्रम साजरे

गोखळी ( प्रतिनिधी): जागतिक महिला दिन व महाशिवरात्री एकदंताय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमानी साजरी  फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती येथील एकदंताय सामाजिक संस्थेच्या वतीने खटकेवस्ती येथे  ” बेलाचे झाड” लावून महाशिवरात्र भक्तीभावाने साजरी करण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आलेल्या बेलाच्या झाडास संरक्षण जाळे लावून करण्यात आले

यानंतर महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे जावून महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविक भक्तानां  एकदंताय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या मोफत बाॅटल वाटप करण्यात आले.तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील महिला बचत गटातील महिलांना शुभेच्छा देऊन फराळ वाटप करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकदंताय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर चव्हाण तसेच विकास गायकवाड, अवधूत धुमाळ, अमित घाडगे, अक्षय चव्हाण, विकास घाडगे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!