हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

चार महिन्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभे करुन विधानसभेचे मत मागणार – आ.जयकुमार गोरे

(म्हसवड/ प्रतिनिधी ): भाजपा हा जातीवाद पसरवणारा, दलित विरोधी,बौद्धांच्या विरोधातील पक्ष म्हणून सतत विरोधक गरळ ओकून लोकांची मने कुलूशित करत आसतात मात्र याच भाजपा सरकारने लंडन मधील बाबासाहेबांचे घर ताब्यात घेऊन ते आपल्या देशात आणले, दादरच्या चैत्यभूमीचा आज दिसतोय तो कायापालट व सर्वात उंच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हिच भाजप उभा करत आहे हे माझ्या समाज बांधवांनी लक्षात घ्यावे आज पर्यंत याच माथी भडकावणार्या विरोधकांनी तुमच्या साठी आज पर्यंत का समाज मंदिर, सांस्कृतिक भवन, पुतळा वाचनालय का उभे केले नाही आज ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भुमिपुजन झाले हे येत्या चार महिन्यात इमारत उभे करून विधानसभेचे मत मागण्याची बैठक याच भवनात घेऊन मत मागणार आहे अन्यथा मत मागाय येणार नाही असे मत माण खटावचे आ जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे व्यक्त केले.


म्हसवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील सांस्कृतिक भवनाच्या समोरील मोकळ्या जागेवर पालिकेच्या वतीने सुसज्ज असे देखणे या परिसरात नसेल असी इमारतीचा भुमिपुजन सोहळा माण खटावचे आ जयकुमार गोरे यांचे हस्ते कुदळ मारुन व कोणशिलेचे उदघाटन करण्यात आले तर समाज बांधवांच्या व महिलांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिंन्हा, विजय धट, नितीन दोशी,वसंत मासाळ,मार्केट कमिटीचे चेअरमन विलास देशमुख, अकिल काझी, सुनील पोरे, सदाशिवशेठ सावंत, सोमेश्वर केवटे माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, अंगुली बनसोडे, विकास सरतापे, सौ सरतापे, जगन्नाथ लोखंडे लुनेश विरकर, बेडूक आबदागिरे, आकाश मेंढापुरे, सह समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी आ. गोरे म्हणाले मी ज्या ज्या वेळी विकास कामाचा शब्द दिला त्या त्या वेळी तो दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी वेळ प्रसंगी पदाचा राजीनामा हि जाहिर केला होता त्यामुळेच आज जे माण खटाव मध्ये पाणी दिसत आहे ते दिसले नसते, म्हसवडच्या पाण्याचा हि कायम स्वरूपी प्रश्न सुटला आसून विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हसवड व परिसराला रोज पाणी मिळणार आहे पाठिमागे म्हसवडच्या नागरीकांनी केलेल्या परिवर्तन मुळे दहा पंधरा दिवसांनी तुम्ही पाणी पित आहे, पाच वर्षात एक हि विकास काम झालं नाही माझ्या काळात झालेली कामे हि नगराध्यक्ष व त्या बॉडीला व्यवस्थीत ठेवता आली नाहीत स्मशानभूमी असो वा गार्डन काय अवस्था केली आहे पालिके शेजारील इमारतीला साधी खिडकी बसवता आली नाही असे म्हणून सत्ताधारी गटावर निशाना साधत पुढे आ गोरे म्हणाले मी हि फुलेनचा वंशज आहे माझे आडनाव व माझे मुळगाव कटगुण आहे हे विसरु नका मी भाजपा मध्ये असतो तरी हि शाहू आंबेडकर, छ शिवाजी महाराज, महात्मा फुले यांना मानणारा बहुजन आहे हे विसरु नका मला तुम्ही मत द्या आगर देऊ नका पण मी तुम्हांला गेल्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचा व पुतळा उभारण्याचा दिलेला शब्द आज एक वर्षाच्या आत कामाला सुरुवात करत आहे या वर्षात या भवनाच्या बजेट मध्ये तिन वेळ बदल केला का तर परिसरात नाही असे हे भवन बांधण्यासाठी जयंतीला पूर्ण होऊ शकले नाही मात्र येत्या चार महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे माझे काम मी करणार आहे तुम्ही मला साथ द्यायची कि नाही हे तुम्ही ठरवा असे आवाहन बौध्द समाजास या भुमिपुजन सोहळ्याच्या निमित्ताने आ जयकुमार गोरे यांनी प्रथम प्रस्तावित करताना कुमार सरतापे म्हणाले आमदार साहेब गेल्या वर्षी पुढील जयंती हि नव्या भवन मध्ये होणार असा शब्द दिला तो आज पुर्ण करत असताना थोडी गडबड केली असे दिसत असले तरी काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा कुमार सरतापे यांनी व्यक्त केली तर धनाजी बनसोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी करुन आगामी काळात बरोबर राहण्यासाठी समाज बांधवांच्या मागणीचा विचार करावा असे बनसोडे यांनी सांगितले

यावेळी मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांच्या या भवनाच्या चिकाटीने कौतुक आ गोरे यांनी केले त्याच प्रमाणे या कामाचे ठेकेदार बोराटे यांनी उद्यापासून काम सुरू करण्याच्या सूचना देत तिन ते चार महिन्यात काम पूर्ण झाले पाहिजे असे सांगितले, तर पालिकेचे इंजिनिअर चैतन्य देशमाने यांनी लक्ष देवून काम करुन घेण्या बाबत सुचना आ गोरे यांनी दिल्या.

यावेळी रोहित सरतापे, प्रणव सरतापे, शुभम सरतापे, वैभव सरतापे, विकास सरतापे, धनाजी बनसोडे अंगुली बनसोडे, सागर सरतापे आदी समाज बांधवानी आ गोरे यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश म्हेत्रे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!