(फलटण/ प्रतिनिधी)८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये महिला दिन सत्कार व व्याख्यान समारंभ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख अतीथी मा. श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (नगरसेविका फलटण नगर परिषद फलटण) कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ.श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (सातारा जिल्हा परिषद सदस्या व स्कूल कमिटी चेअरमन), व्याख्यात्या मा. वैभवी भोसले (महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्भया पथक),सत्कार मूर्ती मा.समीक्षा संजय दिक्षित (महिला युवा उद्योजिका फलटण), मा.सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर (स्कूल कमिटी व्हॉइस चेअरमन), मा. सौ. रीजवाना तांबोळी (अध्यक्षा क्रेडाई ग्रुप), मा. सौ. वर्षा खलाटे (उपाध्यक्ष क्रेडाई ग्रुप), मा. रणवरे मॅडम (निमंत्रित सदस्या), मा. सौ. वैशाली जाधव मुख्याध्यापिका , ,व सर्व महिला पालक उपस्थित होत्या.
कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत व यथोचित सत्कार करण्यात आला.व कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती महिला युवा उद्योजिका फलटण कु..समीक्षा संजय दिक्षित यांना गौरविण्यात आले.तसेच सौ.वैभवी भोसले मॅडम निर्भया पथक प्रमुख,फलटण यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशालेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. प्रथम क्रेडाई वुमन्स विंग च्या सदस्या सौ.चंदा जाधव यांनी क्रेडाई ग्रुप चे कामकाज प्रास्ताविक मधे सांगितले. यानंतर माननीय भोसले मॅडम यांनी महिला सुरक्षितता या विषयावर उपस्थित सर्व मान्यवर व महिला पालक वर्ग यांना संबोधित केले. यानंतर कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती, कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर महिलांचा लकी ड्रॉ घेऊन एका भाग्यवान महिलेस भेटवस्तू देण्यात आली. क्रेडाई वुमन्स विंग यांच्यामार्फत महिला पालकांसाठी व बांधकाम कामगार महिला यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व उपस्थित मान्यवर, महिला पालक ,शिक्षक यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सौ. काशीद (राऊत) मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले