(फलटण /प्रतिनिधी)- ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल बघ विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येतो त्याचाच भाग म्हणून राधा कोचिंग क्लासेसच्या वतीने यावेळी फलटण शहर व तालुक्यामध्ये ज्यांचे सामाजिक शैक्षणिक व महिला सक्षमीकरणांमध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या फलटण नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती, महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव लायन्स फलटण प्लॅटिनमचे अध्यक्ष तथा आस्था टाईम्स संपादिका सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले व बालरोग तज्ञ तसेच आर्ट ऑफ लिविंग मार्फत महिलांचे मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करून महिलांना सक्षम करण्यासाठी मोलाचा वाटा असणाऱ्या फलटणमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सौ. अलका माधव पोळ यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन राधा कोचिंग क्लासेस च्या अध्यक्ष सौ मेघना प्रभंचन कापसे व फलटण नगर परिषदेच्या कार्यक्षम नगरसेविकासव प्रगती जगन्नाथ उर्फ भाऊसाहेब कापसे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
त्याच सोबत समारंभामध्ये सहभागी असलेल्या महिलांसाठी विविध बैठक खेळाचे आयोजन केले होते. यामध्ये सौ. पूजा योगेश बर्गे, श्रीमती आशा घाडगे आणि सौ. ऋतुजा अतुल घोरपडे यांनी विविध खेळांमध्ये यश संपादन केले.डॉक्टर सौ अलका माधवराव पोळ यांनी महिलांना मेडिटेशनचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले.
सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले यांनी महिला कर्तबगार असल्यानंतर समाजामध्ये कशाप्रकारे चांगले बदल घडवून आणू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले यामुळे महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला.
सत्कारमूर्तींच्या मार्गदर्शनानंतर राधा कोचिंग क्लासेस फलटणचे विद्यार्थी यांना त्यांच्या अभ्यासातील प्रगतीनुसार बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक गिरीराज अमोल साळुंखे, द्वितीय क्रमांक सिद्धी सुहास रणसिंग व तृतीय क्रमांक तेजस्विनी संदीप पाटील कार्यक्रमाच्या शेवटी राधा कोचिंग क्लासेस च्या अध्यक्षा सौ. मेघना प्रभंजन कापसे यांनी अध्यक्षीय भाषण करून कार्यक्रमाचा समारोप केला.