हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

एका वर्षापूर्वी नगरविकासकडुन मंजूर झालेले आंबेडकर भवन सात महिन्यांनी पालिकेच्या गहाळकारभाराने रद्द झालेल्या कामाचा शुभारंभ आज आ.जयकुमार गोरेंच्या हस्ते

(म्हसवड /प्रतिनिधी) – म्हसवड नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजूर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना बांधकाम, विरकरवाडी बेघर वसाहत अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, उद्यम नगर क्र. 1 येथे अंतर्गत रस्त्याचे विद्युतीकरण करणे, मल्हार नगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांचे भुमिपुजन उदा रविवारी दिनांक ९/३/२०२४ रोजी आ जयकुमार गोरे यांचे हस्ते सांयकाळी होणार आहे तरी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यच्या”वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत म्हसवड नगरपरिषदेला एका वर्षापूर्वी म्हणजे ८मार्च २०२३ रोजी १० कोटी रुपये मंजूर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालिका हद्दीतील एकुण १६ कामांना हा निधी मंजूर करण्यात आला होता त्या पैकीं डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सांस्कृतिक भवन(आंबेडकर भवन) बांधकामासाठी १० लाख मंजूर झाले होते मात्र म्हसवड पालिकेच्या प्रशासक महाशयाच्या गहाळकारभारामुळे या बांधकामाची प्रक्रिया कागदपत्रे पाठपुरावा वेळच्या वेळी न झाल्याने १९ आॅक्टोबर २३ तब्बल ७ महिन्या नंतर हा १० लाखाचा निधी नागोबा देवालयाला व सनगर समाजाच्या मंदिराकडे म्हसवड पालिकेच्या प्रशासकांनी वर्ग करून बौद्ध समाज्याच्या तोंडाला गोंड बोलून पाणी पुसले होते या बाबत त्यांचेकडे चौकशी केली असता या निधी मध्ये हि इमार बसत नसल्याचे कारण दिले होते तर आ जयकुमार गोरे यांनी १४ एप्रिल २३ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपस्थित राहून समाज बांधवांना पुढील जयंती हि नवीन भवनात होईल असा शब्द दिला होता त्यामुळे हे काम रद्द केल्या बाबत माजी नगराध्यक्ष विजय धट यांचे करवीआ गोरे यांच्या कानावर प्रशासनाचा सुरू असलेला घनशाघोळाची माहिती दिली व प्रशासक यांची भेट घेऊन चौकशी केली आसता ते म्हणाले लवकरच नगर विकास विभागाकडून सव्वा लाखाला मंजूर होणार आहे तो पर्यंत ज्या जागेवर बांधकाम करायचे आहे ती समाजाची जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर लागल्याने पालिकेकडे वर्ग करुन घेऊ असा शब्द दिला होता मात्र आचारसंहितेच्या कारणामुळे उद्या म्हसवड पालिका हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना बरोबर विरकरवाडी बेघर वसाहत अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, उद्यम नगर क्र. 1 येथे अंतर्गत रस्त्याचे विद्युतीकरण करणे, मल्हार नगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांचे भुमिपुजन आ जयकुमार गोरे यांचे हस्ते सांयकाळी होणार आहे तरी समाज बांधवासह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!