(जावली/ अजिंक्य आढाव) – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना सन्मानित करण्यात येते. या मध्ये फलटण येथील दादासाहेब चोरमले यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करून व्यक्ती संस्था त्यांचा सन्मान करण्यात येत असते.सन 2021/22 वर्षी फलटण येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीची कार्याध्यक्ष कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून दादासाहेब चोरमले हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.विशेषत: मुजंवडी येथील श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
दादासाहेब चोरमले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
मिळालेल्या पुरस्कार बद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे नाईक निंबाळकर , सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद नेवसे , यांच्यासह विविध मान्यवरांनी दादासाहेब चोरमले यांचे पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन केले.