हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

भैरवकुंड पाझर तलाव उशाला कोरड पडतेय गावच्या घशाला भैरवकुंड पाझर तलावात धोम बलकवडी कॅनाॅलचे पाणी सोडण्याची मागणी

दुष्काळी परिस्थिती पहाता पाझर तलाव पाणी सोडण्याची मागणी

(जावली/ अजिंक्य आढाव) – जावली ता. फलटण येथील तलावाची पातळी अगदी तळाशी गेली असून केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

१९७२ साली दुष्काळी परिस्थिती पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती आजपर्यंत कधीही हा तलाव पूर्ण तळाशी गेला नव्हता परंतु सध्याच्या परिस्थितीत पाऊस कमी असल्या मुळे धोम बलकवडी कॅनाॅलच्या चालू आवर्तनातील पाणी भैरवकुंड पाझर तलावात सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतं आहे. यंदांचा उन्हाळा कडक जाणवतं असून पुढील एप्रिल, मे,जून महिन्या पर्यंत पाऊसाच्या प्रतिक्षेत राहवे लागणार असल्याने चालू आवर्तनातील धोम बलकवडी कालव्यातून येणारे पाणी जावली भैरवकुंड पाझर तलावात सोडण्याची मागणी होत आहे.

पाझर तलाव गाव आणि कॅनाॅल पासून अर्धा कि.मी अंतरावर असलेल्याने पाईपलाईनव्दारे सोडण्यात यावे, यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या, शेळ्या मेंढ्यांचा प्रश्न सोडणार आहे. त्या बरोबरच फलटण पूर्व भागातील जावली गावच्या यात्रेत भरपूर प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त हजेरी लावतात ,तर गावातील पाणी पुरवठा करणारी विहीरही तलावाच्या पायथ्याला असुन संपूर्ण गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात तलाव पाणी सोडण्याची मागणी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!