(जावली/प्रतिनिधी) राजुरी ता फलटण गावच्या यात्रेत कुस्ती लावण्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी विनोद किसन सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि २६ रोजी राजुरी गावच्या यात्रेत कुस्ती लावण्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीत संशयित ज्ञानदेव आंनदा गावडे, पंकज ज्ञानदेव गावडे व ओंकार संपत सांगळे , सर्व राहणार राजुरी यांनी कुरवली पाटी येथील सावतामाळी हाॅटेलच्या समोर पोत्यातून आणलेल्या तलवारीने डोक्यात व हातावर तलवारीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रार दिली आहे , तर दुसऱ्या फिर्यादीत ज्ञानदेव आंनद गावडे यांनी फिर्यादी विनोद किसन सांगळे, दर्पण बाळासो सांगळे , यशराज विनोद सांगळे, धीरज शरद सांगळे, रोहन उर्फ पिनू अंकुश सांगळे, बाळासो येंकु सांगळे,सोनबा येंकु शेंडगे, सर्व राहणार राजुरी यांनी दि. २६ रोजीच्या पुतण्याच्या नेमण्यात आलेल्या कुस्ती थांबवण्यात आलेच्या कारणावरून मला व माझा मुलगा पंकज याला जिवे मारण्याचा उद्देशाने जीवघेणी हल्ला केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अधिक तपास पोलिस नाईक आडके करतं आहेत.