(गोखळी/प्रतिनिधी)- गोखळी (गोखळीपाटी) ता. फलटण येथे बेवारस बेघर महिला आणि मुलगी दोन दिवसापासून गोखळीपाटी येथे भटकंती करताना त्यांची चौकशी केली असता. त्यांचे नाव श्रीमती छबुताई धावडं रा.अजनुज ता.श्रीगोंदा सांगितले. मुलगी आशा मतिमंद आहे.आणि मला कोणीही नातेवाईक नाहीत असे सांगितले.
यावेळी गोखळी गावचे पोलीस पाटील विकास शिंदे यांनी आसरा टीमचे सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. आसरा टिमचे राजू गावडे पाटील व.सागर चव्हाण तात्काळ या ठिकाणी येऊन या महिलेची विचारपूस केली.या महिलेने मला काम मिळाले तर बरे होईल असे सांगितले. यावेळी राजू गावडे पाटील यांनी कऱ्हावागज ता.बारामती येथील
निवासी मूकबधिर संस्थेच्या व्यवस्थापक अध्यक्ष सौ. रामेश्वरीताई जाधव यांच्याशी संपर्क साधून महिलेविषयी सर्व माहिती दिली असता. ताई म्हणाल्या की छोटे-मोठे काम करत असेल तर त्यांच्या मुलीलाही सांभाळू आणि त्यांनाही त्या कामाचा मोबदला देऊ असे ताई नी सांगितले.दुसऱ्या दिवशी राजू गावडे पाटील यांनी बरड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरबट साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण माहिती दिली.
व त्या महिलेची व मुलीची जेवणाची व्यवस्था करून त्यांना संस्थेमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेले व संस्थेमध्ये दाखल केले.
यावेळी गोखळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव गोखळी वि.का. सोसायटी संचालक शशिकांत उर्फ बंडू फडतरे दत्तात्रय एकाड साहेब खटकेवस्ती पोलीस पाटील श्री.राजु धुमाळ गोखळी ग्रामपंचायत क्लार्क श्री सुरेश आप्पा चव्हाण उपस्थित होते. आसरा टिमचे राजू गावडे पाटील आणि सागर चव्हाण यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे गोखळी आणि परीसरातून कौतुक केलं जातं आहे.