हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

बिबी येथील किरण आवारे , कुमार काकडे दोघांना सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षांकरिता तडीपार

(फलटण/ प्रतिनिधी) बीबी तालुका फलटण येथील किरण रमेश आवारे (वय २०)रा.बिबी ता.फलटण जि. सातारा, कुमार लालासो काकडे (वय २१)रा.बिबी ता.फलटण जि. सातारा यांचेवर जबरी चोरी करणे दरोडे ची तयारी करणे दुखापती करून शिवीगाळ गुंदाटी करून विनयभंग करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्याबाबतचा हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावाची चौकशी श्री राहुल.आर . धस उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनही जामिनावर बाहेर आल्यावर वेळीवळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही, अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यामधे सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा लोकांनाफार उपद्रव होत होता. अशा इसमांनवर म. पो.का.कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे.नोव्हेंबर 2022 पासुन म.पो.का कलम ५६ प्रमाणे १९ उपद्रवी टोळ्यांमधील ६३ इसमांना .मी.पो.का.कलम ५३ प्रमाणे १७ इसमांना म.पो. का कलम ५७ प्रमाणे 2 इसमांना असे एकूण 82 इसमांचे विरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आले आहे. भविष्यात सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी, मोक्का ,एमपीडीए अशा कडक कारवाई करण्यात येणार आहेत .

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा सातारा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने ,पो.काॅ.हवा‌ प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.काॅ.अनुराधा सणस , फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.हवालदार वैभव सुर्यवंशी, पो. ना श्रीनाथ कदम , यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!