हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन ; फलटण तालुका (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने जाहीर पाठिंबा

(जावली/अजिंक्य आढाव) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू असून या आंदोलनासाठी फलटण तहसील कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या आंदोलन स्थळी जाहीर पाठिंबा देत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व आंदोलनास पाठिंबा दिला.

या वेळी शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री नितीन बानगुडे पाटील सर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये शिवसेना फलटण तालुका प्रमुख श्री विकास नाळे , ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख श्री विश्वासराव चव्हाण, शिव आरोग्य सेना जिल्हा सचिव श्री शैलेंद्रदादा नलावडे, युवासेना तालुका अधिकारी श्री अभिजित कदम, माथाडी कामगार सेना तालुका प्रमुख श्री नंदकुमार काकडे, युवासेना शहर अधिकारी श्री अक्षय तावरे, युवासेना उप तालुका अधिकारी महेंद्र घाडगे व श्री प्रतीक रीटे, ग्राहक संरक्षण कक्ष उप तालुका प्रमुख श्री.जितेंद्रतात्या घाडगे , मनोज गोसावी, श्री जगदाळे काका, अदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!