हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

आत्मविश्वास हा यशाचा मार्ग दाखवतो – शिवाजी सावंत

गोखळी (प्रतिनिधी) : आत्मविश्वास आपणाला यशाचा मार्ग दाखवतो विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आत्मविश्वासाने सामोरे जावे असे प्रतिपादन बरड दुरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सावंत  यांनी केले.

फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयातील एस.एस.सी.मार्च २०२४ ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप देण्याचा समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून न्यु इंग्लिश स्कूल पाडेगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर खरात अध्यक्षस्थानी हनुमान माध्यमिक विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग गावडे ( सवई) उपस्थित होते.यावेळी सावंत साहेब बोलत होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य एच.डी. अभंग सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले शेखर खरात, पै. बजरंग गावडे, मारुती बापू गावडे, बजरंग गावडे( सवई).मनोज तात्या गावडे, राधेश्याम जाधव यांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणवत्तेचे उत्तीर्ण होऊन पालक, विद्यालय आणि गावच्या नावलौकिक वाढवावा असे आवाहन करुन परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसगी चैतन्य कुमठेकर ,कुमारी स्वप्नाली मदने, निकिता माने , मान्यता जाधव, यांनी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव बापू गावडे (सवई),शेखर खरात, श्रीराम बझार चे संचालक मारुती बापू गावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै .बजरंग गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे( सवई)संतोष दादा गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, पोलिस पाटील विकास शिंदे , मोहन ननवरे सर,सुनील सस्ते सर, विकास घोरपडे सर,किरण पवार सर उपस्थित होते.मोहन ननवरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किरण पवार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!