हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गिरवी ता.फलटण येथील रामदास भुजंगराव कदम यांना शासनाचा “उद्यान पंडित” पुरस्कार जाहीर

(जावली/ अजिंक्य आढाव) – शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी विषयक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलउत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना त्यांच्या शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सामान्य करण्यात येते.

या मध्ये गिरवी तालुका फलटण येथील “कुरोली फुड्स” कोळकी तालुका फलटणचे संचालक तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा (यशवंत कृषी) मंच अध्यक्ष शेतीतज्ञ कृषिरत्न रामदास भुजंगराव कदम यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून रामदास कदम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तसेच विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक राव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!