हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मौजे राजुरी येथे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ

(फलटण/ प्रतिनिधी) – फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या घोष वाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२३-२४ मौजे राजुरी, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिराचे उद्घाटन मा. श्री. शरदराव रणवरे, व्हॉईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, स्थापना, पाश्र्वभुमी व शिबिरामध्ये राबवायचे उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती प्रा. सागर तरटे यांनी दिली. सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्व, ग्रामीण भागाचा विकास, मुलभूत उद्धिष्ये या विषयावर लक्ष केंद्रित केले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मौजे राजुरी येथे स्वच्छ गाव समृध्द गाव, शास्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास, ग्राम सर्वेक्षण व गावचा इतिहास, स्त्री जन्माचे स्वागत व बालविवाह बंदी, व्यसनमुक्ती व आरोग्य सवर्धन, मतदार जनजागृती अभियान, वृक्षारोपण, माती परीक्षण, रस्ता दुरुस्ती व डागडुजी, समाज प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिक व्यवस्थापन यासारखे सामाजिक जिव्हाळ्याचे व कृषि संबधित उपक्रम शिबिर कालावधीत गावामध्ये राबविणार असल्याचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. सदरील शिबिर कालावधीमध्ये तरुण पिढी समोरील आव्हाने व व्यसनमुक्त भारत, स्वच्छ व सदृढ भारत अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, शाश्वत जगाची निर्मिती, ग्रामीण महिलांचे सबलीकरण, पर्यावरण सवर्धन व मानवी जीवन, राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, शेतीपूरक व्यवसाय व ग्रामीण विकास, उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विविध विषयावर तज्ञांचे व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी माहिती कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी उपस्थितांना दिली. मा. श्री. जयकुमार इंगळे, अध्यक्ष, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उत्कृष्ट काम करतील असा आशावाद व्यक्त केला व गावातील ग्रामस्थ स्वंयसेवकांना सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. राजुरी परिसरातील ग्रामस्थ विशेष करून महिलांनी, युवकांनी सदरील शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेवुन स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना मा. श्री. शरदराव रणवरे यांनी व्यक्त केली. सदरील कार्यक्रमाला मौजे राजुरी गावचे सरपंच मा. श्री. शिवाजी पवार, श्री. नितीन गांधी, मे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, मा. श्री. सचिन पवार, माजी सरपंच, मौजे राजुरी ग्रामपंचायत, मौजे राजुरी गावातील ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले व स्वंयसेवक उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आभार मा. श्री. कांतीलाल खुरंगे, संचालक, फलटण तालुका शेतमाल व फळ प्रक्रिया उद्योग यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!