हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

ह.भ.प.हरीदास खोमणे (अण्णा )यांचे दुःखद निधन

(गोखळी/ प्रतिनिधी)- येथील जेष्ठ नागरिक ह.भ.प.हरीदास कोंडीबा खोमणे (अण्णा) (८९) यांचे सकाळी ९-१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी ,एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली , नातवंडे असा परिवार आहे.

भारती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष,भारती महिला सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र खोमणे सर यांचे वडील होत.ह.भ.प.हरीदास खोमणे यांना अण्णा टोपण नावाने ओळखले जात असे सामाजिक धार्मिक कार्याबरोबर आळंदी – पंढरपूर पायी वारी,भजन कीर्तनात सहभाग असे.राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण , बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजबांधव सहभागी झाले होते . गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!