हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या वतीने मातृ पितृ पाय पूजन सोहळ्याचे दि २४ रोजी आयोजन

(जावली/ अजिंक्य आढाव) – संस्कारक्षम असा मातृ-पितृ पाय पूजन सोहळा जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या वतीने शनिवार दि.२४ रोजी विद्यालयामध्ये सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयुष्य एक दिवा आहे , पण त्याच दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आई वडील असतात. अशा या आई-वडिलांची ऋण आपण कधीही फेडू शकत नाही म्हणूनच त्यांच्या प्रति प्रेमभाव, आदर, कृतज्ञता व्यक्त करणे हे परम कर्तव्य असते. हे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृ-पितृ पाय पूजन सोहळा होय.

आई वडील हे माऊलींचे रूप असून आपल्या जडणघडणीत व जीवन यशस्वी होण्यासाठी सहभाग असतो असे मत जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अमोल चवरे सर यांनी व्यक्त केले.

दि.२४ रोजी रॉयल इंग्लिश स्कूल जावली च्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आई वडील अथवा आजी – आजोबा यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक समीर गावडे सर यांनी केले आहे.

या कार्यक्रमा वेळी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी पालकांनी उपस्थित राहावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!