हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

(फलटण/प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरी शेठ फडके यांचे निधन वडिलांच्या काळापासून 1986 पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास 40-50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत.

मुळचे पनवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती.

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’ मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. आज त्यांचं निधन झालं आहे.

आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!