हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

नाईकबोंमवाडी येथे १ कोटी १७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटने व भुमिपूजन

कृष्णेच पाणी नाईकबोंमवाडी परिसरात खळखळनार आमदार रामराजे निंबाळकर

(जावली/ अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील भौगोलिक परिस्थिती मुळे नाईकबोमवाडी परिसरात पाणी पोचवण्यास उशीर झाला.हा भाग पाण्यावाचुन वंचित राहणार नाही.त्यासाठी बोगदा काढून पाणी आणण्याची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच प्रत्यक्ष कार्यवाही होईल आणि पुढच्या आवर्तनावेळी पाणी या भागात पोहचेल अशी ग्वाही आमदार रामराजे यांनी नाईकबोंमवाडी च्या कार्यक्रमात दिली.

नाईकबोमवाडी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये 1कोटी 17 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कृष्णेच्या पाण्यासह संपूर्ण विकास आपण केल्याचे सांगून श्रेय घेण्याचा खासदारांचा प्रयत्न म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे टीका करत आमदार रामराजे निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वर सडकून टीका केली

रामराजे म्हणाले आमच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या 37 हजार हेक्टर क्षेत्रावर जिथे या तालुक्यातील लोक जमिनी कसे होते त्या काढून न घेता या जमिनी शेतकऱ्यांना कुळ कायद्याचा लाभ देऊन मालकी हक्काने दिले आहेत नाईकबोंमवाडी येथे माजी आमदार (कै.) शिवाजी राजे यांच्या नावावर असलेल्या जमिनी त्यांनी स्वतःहून संबंधित लोकांना दिल्या आहेत. आता ट्रस्टच्या ज्या जमिनी वसाहतीसाठी दिल्या जात आहेत, त्या पूर्वी आमच्याच होत्या लोणंद ,खंडाळा, सुरवडी औद्योगिक वसाहती तेथील शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या उभ्या राहिल्या. त्या माध्यमातून औद्योगिक विकास झाला सुमारे 6 हजार तरुणांना नोकरीचे संधी आणि अनेकांना स्वतःची उद्योग व्यवसाय उभी करण्याची संधी लाभली आहे. या उलट त्यांनी नाईकबोंमवाडी येथे औद्योगिक वसाहत केवळ आपल्या व ट्रस्टच्या जमिनीला चांगले पैसे मिळतील यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप श्रीमंत रामराजे यांनी केला जर त्यांना खरंच औद्योगिक वसाहत उभारावयाची असते तर सुरवडी लागुन सातारा रस्त्यावर उत्तम औद्योगिक वसाहत उभारता आली असती पण हेतू वेगळा असल्याने नाईकबोंमवाडी साठी प्रयत्न केल्याचा आरोपही आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला ते म्हणाले विधिमंडळ आणि सरकारचे काम सुरू झाले त्यावेळी राज्याच्या वाट्याचे पाणी ऑगस्ट 2000 पर्यंत अडवली नाही. तर त्यावरील राज्याचा हक्क जाणार असलेला समोर आले उद्या पाच वर्षात सात हजार कोटी शासन उपलब्ध करून देऊन प्रकल्प उभे राहणे आणि पाणी आढळून वापरू सुरू करणे कठीण काम होते दुसरीकडे पिढ्यान पिढ्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील रहिवासी व शेतकरी असलेल्या प्रकल्पग्रस्त तेथून व विस्थापित होण्यास तयार नव्हते. तिच्यासोबत त्यांनी सन्मानाने सामावून घेण्याचा विश्वास दिला परंतु तिथून त्यांनी लाभ क्षेत्रात येण्याचे मान्य केल्यानंतर प्रकल्पाची कामे मार्गी लागली मुदतीत पाणी आढळून त्यावरील हक्क अभयात राबता आला त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यामध्ये प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सात मोलाची ठरली धडपडीनंतर ना पूर्ण झालेला प्रकल्प आता आम्ही केली आणि आम्हीच आणली म्हणून भूमिपूजन उद्घाटणे करण्याचे योगदान काय असा सवाल रामराजे यांनी या सभेमध्ये केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!