हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

जावली ता फलटण येथे शिवरत्न तरूण मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

(जावली/ अजिंक्य आढाव)- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त जावली ता. फलटण येथील शिवरत्न तरूण मंडळ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

शिवजयंती निमित्ताने या ही वर्षं पुणे जिल्ह्यातील सिंहगड येथून ज्योत आणण्यात आली.तर शिवजन्मोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी राजनंदिनी पडर, कृष्णाली पडर , अनुष बाबर , वैष्णवी नाळे , श्रेया भोसले इत्यादी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चारित्र्यावर भाषणे केली.या वेळी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले

कार्यक्रमावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने श्रीफळ वाढवत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!