हि बातमी ईतर भाषेत वाचा
राजकीय

तिन सिंहाच्या डरकाळ्या,राजेंची राजेशाही महादेवाच्या माढ्यातील निकाल बदलणार का..?

माढ्याचे खासदार रणजितसिंह यांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोध मोडित काढणार का..?

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजिवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली नाही तर रामराजे निंबाळकर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे वैर विसरून प्रचार करणार की संजिवराजे निंबाळकर यांना अपक्ष उतरवणार, कि शरदचंद्र पवार यांच्या गटात जाऊन उमेदवारी घेणार का? कि अभयसिंह जगताप यांचा प्रचार करणार
खा. रणजितसिंह निंबाळकर यांची सावली असलेले माण खटावचे आ जयकुमार गोरे रणजितसिंह यांच्या विजयासाठी पुन्हा विरोधकांना धोबीपछाड देणार का ?
* लोकसभेतील विरोधाचा फटका येणाऱ्या विधानसभेला आ गोरे यांना रामराजे व मोहिते पाटील यांना मानणारे माण खटाव मधील मतदार देणार कि गोरे मताधिक्य वाढणार..
धनगर आरक्षण प्रश्नी म्हसवड येथे १५ दिवस उपोषण सुरू होते मात्र या उपोषणाला धनगर समाजाचे नेते व आ महादेव जानकर, आ गोपिचंद पडळकर, आ राम शिंदे सह
प्रकाश शेंडगे, या पैकी कोणच फिरकले नसल्याने नाराज धनगर समाज कोणती भूमिका घेणार ..?

(एल के सरतापे / म्हसवड ): माढा लोकसभा मतदार संघातून अनेकांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी महायुतीत उमेदवारीचा तिढा कायम असून खा रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशीलसिंह मोहिते पाटील या भाजपच्या दोघामुळे गटबाजीला अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजिवराजे यांची उमेदवारी रामराजे यांनी जाहीर केल्याने व रासपाचे महादेव जानकर यांनी गावभेटी बरोबर माढ्यात जागृत रॅली मेळाव्यातुन मीच उमेदवार म्हणून माढा ढवळून काढला या तिघांच्या उमेदवारीमुळे खा. रणजितसिंग निंबाळकरासह भाजपाच्या वरिष्टांची डोके दुखी वाढल्याचे चित्र माढ्यात एकीकडे दिसत आहे तर राष्ट्रवादी मधील फुटी नंतर माढ्यात शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी पायाला भिंगरी बांधून माढा पिंजून काढला असल्याने माढ्याची लढत रंगतदार होऊन दुरंगी की तिरंगी होणार तिरंगी झाली तर फायदा कोणाला ?उमेदवार कोण कोण? यावरही माढ्याचे राजकीय गणिते अवलंबून असले तरी माढ्यातील तिन सिंहाच्या डरकाळ्या आणि महादेवाचा थयथयाट राजेची राजेशाही माढ्याचा निकाल बदलणार का..?

पंधरा वर्षापूर्वी नव्याने उदयास आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून पहिल्या विजयाची सलामी राष्ट्रवादीचे संस्थापक नेते शरदचंद्र पवार यांनी दिली होती दुसऱी सलामी विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर हॅडरिकची चौरंगी लढत भाजपाच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जिंकत विजयसिंह मोहिते पाटील,शिंदे बंधू व माण मधून आ जयकुमार गोरे यांच्या पाठबळावर खेचून आणला होता या वेळी मात्र माढ्याचे चित्र वेगळे बनले आहे तिसऱ्या लढतीला जे बरोबर होते ते विरोध झाले तर जे विरोध करत होते ते मित्र माढ्यात पहावयास मिळत आहेत सध्या सत्ताधारी गटातच उमेदवारीसाठी चुरस लागली आहे भाजपा मधून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पुन्हा षडू ठोकला आहे तर गत वेळी विजयाची माळ निंबाळकरांच्या गळ्यात घालणारे आकलुजचे भाजपाचे नेते धैर्यशीलसिंह मोहिते पाटील यांनी गावोगावी बैठका करून फलटण म्हसवड वडुज, सांगोला करमाळा माढ्यातील राजकीय मंडळीच्या भेटी घेऊन “हम भी तैयार है” पक्षाने विचार केला तर ठिक नाही तर अन्य कोणता पर्याय शोधायचा यावर माढ्यात गावभेटीचे भिरकिट मोहिते पाटील यांनी सुरू केले आहे तर भाजपाचा मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी सभापती रामराजे ना निंबाळकर व खा रणजितसिंह निंबाळकर यांचे विळ्या भोपळ्याचे वैर हे सर्वांना माहित आहे महाराज साहेब यांनी पुन्हा टोकाचा निर्णय घेत खा रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधात माजी जिप अध्यक्ष संजिवराजे ना निंबाळकर यांना माढ्याच्या रणांगणात उतरवणार असल्याचे जाहीर केल्याने माढ्यात राजाचाच बोलबाला सध्या सुरु असताना बाबानी माढ्याच्या नेते मंडळी बरोबर उठक बैठकीतून निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरू केल्याने भाजपाचा मित्र पक्षानेच भाजपाच्या विद्यमान खासदारांच्या विरोधात रणशिंग फुकल्याने भाजपा, सेना, राष्ट्रवादी, रासपा व मित्र पक्ष असलेले आरपीआय, शेतकरी संघटना, प्रहार आदी कडून नक्की कोण रणजितसिंह कि संजिवराजे याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

भाजपा मधील मित्र पक्ष असलेला व भाजपाच्या गोट्यातुन आमदार झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री आ महादेव जानकर हे भाजपा मधील चौथे उमेदवार माढ्याच्या मैदान अनेक दिवसांपासून माढ्यात जनसंपर्क रॅली, मेळावे, घर चलो, ओबीसी मेळावा व सध्या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून माढ्याच्या खटाव, माण, फलटण, माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा या पाच तालुक्यात प्रचार शिगेला पोचवून” मीच माढ्याचा खासदार, आत्ता नाही सुटी कोणाला” म्हणून मित्र पक्ष असलेल्या भाजपाला एकीकडे उमेदवारी साठी नाकीनऊ करून सोडले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या हि संपर्कात महादेव जानकर काही दिवसांपूर्वी होते २००९ च्या निवडणुकीत पवार साहेबांच्या विरोधात याच माढ्यात तिन लाखाच्या दरम्यान धनगर समाज्याची वोट बॅक असताना जानकर यांनी एक लाख मते घेतली होती त्याच माढ्यात पुन्हा १६ वर्षानंतर महादेव जानकरांनी लोकसभेला रणशिंग फुकले आहे भाजपाने विद्यमान खा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवार दिल्यास रासपाचे महादेव जानकर , राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे संजिवराजे निंबाळकर व धैर्यशीलसिंह मोहिते पाटील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना मदत करणार का ? का वेगळी वाट धरुन शरदचंद्र पवार गटाला मदत करणार कि वेगळा मतदारसंघ शोधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार यांना मानणारा मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो मात्र गत वेळी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा फटका व मोहिते पाटील व इतरांनी केलेला भाजपा प्रवेशाचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांला बसल्याने माढ्यात भाजपाचे कमळ फुलले होते यावेळी मात्र उलटे चित्र दिसत आहे गत वेळी जे जे भाजपा बरोबर होते ते ते भाजपा उमेदवार यांचे विरोधात स्वताला उमेदवारीची मागणी करत आहेत भाजपा मित्र पक्षातून चौघे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी सरसावले असल्याने राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप यांनी माढ्याच्या रणसंग्रामात तीन ते चार महिन्यात आपली वेगळी छाप राष्ट्रवादी आपल्या दारी “होम टु होम “हि अभिनव संकल्पना घेऊन कधी युवकांसाठी डे नाईट क्रिकेट सामने, हाॅलीबाॅल, कब्बडी स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या गळ्यातील ताईत बनले तर महिलांसाठी खेळ पैठणीचा ,होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमानी माढ्यात आज पर्यांतच्या महिलांची रेकार्ड ब्रेक गर्दी करुन अभयसिंह जगताप यांनी वेगळे रेकॉर्ड केले माण व खटाव मध्ये ही युवकांच्या गळ्यातील ताईत क्रिकेटच्या माध्यमातून बनले कोव्हीड मध्ये शेकडो लोकांना जिवदान वरकुटे मलवडी येथे मोफत कोव्हीड सेंटर सुरू केले, मोफत औषधोपचार, रुग्णवाहिका, रक्तदान शिबीर े, वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावच्या कायम पिण्याच्या व शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी जन आंदोलनाच्या माध्यमातून मतदारांच्या मनामनात बसलेला आपल्या मनातील निडर, ज्याला भय नाही असा अभय माढ्याचा खासदार म्हणून पवार साहेबांनीच अभयसिंह यांना लढ म्हणून पाठीवर थाप टाकल्याने अभयसिंह जगताप यांनी माढा पिंजून काढला आहे राष्ट्रवादी पक्षात झालेली दुफळी माढ्याच्या मातीत कुठे हि दिसून येत नाही तरी हि आगामी काळात राष्ट्रवादी मधील अजित पवार गटाचे आ शिंदे बंधू,मोहिते पाटील, रामराजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या विरोधात भूमिका घेणार का ? येणाऱ्या काही दिवसात माढ्याचे चित्र स्पष्ट होणार असून कोण उमेदवार,? कोण कोणाला पाठिंबा देणार,? या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणार कोण  माढ्यात किती पक्ष उमेदवार देणार ? संजीवराजे व धैर्यशीलसिंह उमेदवारी मिळाली नाही तर कोणाच्या पाठीवर हात ठेवणार ? माढ्यात लढत दुरंगी, तिरंगी कि चौरंगी होणार.. ? याची उत्सुकता लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!