हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सातारा जिल्हा नियोजन समितीवर म्हसवड चे माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी यांची निवड

(म्हसवड/ प्रतिनिधी) –  म्हसवड पालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातारा जिल्ह्यातील विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले युवराज सुर्यवंशी यांची सातारा जिल्हा नियोजन समितीवर विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सदस्य म्हणून निवड करण्यात आली शासनाकडून डिपीडीसी सदस्य म्हणून म्हसवडचे पहिले सदस्य आहेत त्यांच्या या निवडी बदल अनेकांनी सुर्यवंशी यांचे अभिनंदन केले आहे

म्हसवड नगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवक, गट नेते, म्हसवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशी अनेक पदावर काम केलेले व राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू व जवळचे कार्यकर्ते म्हणून सातारा जिल्ह्यात आपली वेगळी छाप असलेले सुर्यवंशी यांनी ठेवली असून म्हसवड नगरपालिकेच्या विकासासाठी अनेक कामांना निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करुन निधी आणण्याचे काम कोणते हि पद नसताना सुर्यवंशी यांनी केला तिर्थक्षेत्र विकासासाठी २९/७ /२३ रोजी २५ कोटीची मागणी केली , सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता नना भरणे यांचेकडून खडकी , भाटकी २०२० मध्ये मंजूर केला त्यावर राजकीय द्वेषा पोटी स्टे बसवला होता तो गेल्या महिन्यापूर्वी उठवला, १०/२/२२ मध्ये नवीन पाणी योजनेसाठी निधीची मागणी करुन त्याचा सर्वे हि झाला होता त्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठे प्रयत्न केले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना १०/२/२२साली म्हसवडला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला, कारखेल फिल्टर टॅकला ९/१०/२० रोजी डिपीसाठी पाठपुरावा करून २०२१ मध्ये स्वतंत्र डिपी सुरू केला याप्रमाणे म्हसवड बस स्थानकाच्या कामासाठी, विश्रामगृहाच्या दुरुस्ती साठी त्याच प्रमाणे विश्रामगृहाच्या मागील बाजूला असलेला बंधारा दुरुस्ती, म्हसवड व परिसरात दिडशे लाईटच्या पोलसाठी व डी पी साठी प्रयत्न करुन उभे केले अशी शेकडो म्हसवड व परिसरात कोणते हि पद नसताना केवळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू म्हणून अनेक कामे मंजूर करून सुरू करणारे युवराज सुर्यवंशी यांनी आज पर्यंत दादांनाकडे कोणत्याही पदाची मागीतले केली नव्हती मात्र सब्रका फल मिटा होता आहे या म्हणी प्रमाणे आज सुर्यवंशी यांना त्यांनी केलेल्या कामाचे फळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या पदावर महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली या निवडी बदल सभापती रामराजे नाईक निंबाळकर , आ मकरंद पाटील, आ दिपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजिवराजे निंबाळकर, बॅकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अमित कदम, बाळासाहेब आदीनी युवराज सुर्यवंशी यांचे अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!