म्हसवड पालिकेचे प्रशासक यांची खातेनिहाय चौकशी करून सुरू असलेल्या पाणी योजनेसह इतर कामातील भ्रष्टाचाराची चौकशीसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन – माजी नगराध्यक्ष धट
(म्हसवड/ प्रतिनिधी) म्हसवड पालिके मध्ये गेले तिन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे कि भ्रष्टाचाराचे कुरण तीन वर्षापासून भोंगळ कारभार व मनमानी हुकूमशहा पध्दतीने जनहिताच्या कामाला खुंटीवर ठेवून नव्य पाणी योजनेत कमिशन राज सुरू असल्याने ८० कोटीची पाणी योजना सुरू होण्यापूर्वीच बेसुमार व निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे भूमिपुत्रांना डावलून आपल्या मर्जीतील सांगली, कोल्हापूर, अकलुज या भागातील ठेकेदारांना या योजनेची पाईपलाईन खोदाईचे, स्वच्छता ठेका पुण्याच्या ठेकेदारांना, रोजंदारी कामगारांचा ठेका पुण्यातील ठेकेदारांना शासकीय नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर पणे पालिकेत प्रशासकीय कामे सुरू आहेत तरी मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांची व विविध सुरू असलेल्या कामाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी येत्या २० फेब्रुवारी पासून पालिकेच्या समोर अमरावती उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , नगरविकास मंत्री जिल्हाधिकारी यांना पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी दिले आहे.
म्हसवड नगरपरिषदेमध्ये गत ३ वर्षापासुन प्रशासकीय राजवट सुरु असुन प्रशासन अधिकारी म्हणुन डॉ. सचिन माने हे काम पहात आहेत. पालिकेत सध्या फक्त प्रशासकीय राजवट सुरु अस ल्याने मुख्याधिकारी डॉ. माने यांचा पालिकेत मनमानी कारभार सुरु आहे. आमचे नेते माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातुन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतुन पाणी पुरवठा योजना नव्याने कार्यान्व करणे, रस्ते करणे, यासह अन्य विविध विकासकामे करणे याचे नियोजन आहे. केले होते मात्र आमदारांनी केलेल्या म्हसवडच्या जनतेसाठी च्या नियोजनाला केराची टोपली दाखवत शहरात पाणी टंचाई आहे हे व भविष्यात येणार्या दोन महिन्यात या पेक्षा जास्त पाणी टंचाई होण्याची शक्यता हे लक्षात घेऊन या नव्या योजनेचे प्रथम काम इस्लामपूर पाणी साठवण तलाव ते कारखेल फिल्टर टॅक पर्यंत नवी पाईपलाईन टाकल्यास सतत पाईप फुटण्याच्या व लिकींज होण्याचे प्रकार थांबून शहराला रोज पाणी मिळाले असते मात्र मुख्याधिकारी यांनी ते महत्त्वाचे काम मेन पाईप उपलब्ध होत नाही हे थातुर मातुर कारण सांगून वाड्या वस्तीवर अडीच इंची पाईप रस्त्याच्या बाजुला एक ते दिड फुट पोकल्यान व जेसीबी काढलेल्या खड्यातील पाईपचे आयुष्यमान मुख्याधिकारी यांच्या मनमानी मुळे किती वर्षे टिकणार चांगल्या पाणी योजनेला मुख्याधिकारीच चिरीमिरी मुळे डांग लावत आसल्याचा आरोप धट यांनी करून शेवटी म्हणाले.
शहराच्या स्वच्छतेच्या ठेक्यात मोठा भ्रष्टाचार असुन ज्या कंपनीच्या साह्याने शहर स्वच्छता केली जात आहे त्या कंपनीला याकामी देण्यात आलेली ठेका रक्कम ही अवाच्या सवा आहे. या कंपनीपेक्षाही अर्ध्या रकमेत दुसरी कंपनी हे काम करण्यास तयार असताना मुख्याधिकारी हे केवळ सदर ची कंपनी आपणाला हवे तेवढे कमीशन देत असल्यानेच दुसर्या कंपनीचा विचार करीत नाहीत यातुन त्यांना दरमहा लाखो रुपये हे कमीशन स्वरुपात मिळत आहे, हीच स्थिती पालिकेतील कंत्राटी कर्मचारी पुरवण्याच्या ठेकेकामीही आहे. या उलट पालिकेत सामान्य जनतेला किरकोळ कामासाठी ही नाडवले जात असल्याची वस्तुस्थिती आहे जर एखाद्या सामान्य व्यक्तीला आपले घरकुल उभारायचे असेल तर त्याला बांधकाम परवानगी साठी अनेक खेटे मारण्यास लावले जात आहेत मात्र जी व्यक्ती यासाठी काही दाम देण्याची तयारी दर्शिवते त्यांनाच असा परवाना दिला जात आहे त्यामुळे जो देतोय दाम त्याचेच येथे होते काम ही नवीन टँगलाईन पालिकेत निर्माण झाली आहे. शहरातील पथदिवे बदलणेकामीही मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे त्याचीही चौकशी होणे अपेक्षित आहे. म्हसवड पालिकेतील त्यांचा कार्यकाल पुर्ण झाल्यावर त्यांची प्रमोशनवर भिवंडी येथील महापालिकेत उपायुक्त म्हणुन बदली झाली असताना महोदयांनी अवघ्या दोन महिन्यात पुन्हा आ गोरेना भेटून रिव्हर्स टाकून म्हसवड पालिकेत माला माल होण्यास रुजु झाले याचाच अर्थ ते पगार भिवंडी महापालिकेचा घेतात तर कमीशन म्हसवड पालिकेत खातात असे चित्र सध्या सुरु आहे.याच्या निषेधार्थ मंगळवार दि. २० फेब्रुवारी पासुन पालिका मुख्याधिकार्यांच्या विरोधात म्हसवड पालिकेसमोर अमरण उपोषण करणार असल्याचे विजय धट यांनी सांगितले.