हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मासिक आढावा बैठकीत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याला 4 पुरस्कार

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी कौतुकास्पद - पोलीस अधीक्षक समीर शेख

(फलटण /प्रतिनिधी) – फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला मासिक गुन्हे आढावा बैठकीत ४ पारितोषिके प्राप्त झाली असल्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केले आहे. मासिक गुन्हे आढावा बैठक आज सातारा येथे पार पडली या बैठकीत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने विशेष कामगिरी केल्यामुळे त्यांना सदरचे चार बक्षीस देऊन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मा. अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल या उपस्थित होत्या.सदर बैठकीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारामध्ये बक्षीस दिली जातात.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला ४ बक्षिसे मिळालेले आहेत. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला सर्वात जास्त मालमत्ता हस्तगत केली म्हणून 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच 2023 मध्ये सर्वोत्तम अजामीन पात्र वारांची बजावणी बाबतची बक्षीस सुद्धा फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले. आणि त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल निर्मितीचे तिसरे बक्षीस फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले.आहे तर जानेवारी 2024 मध्ये सर्वात जास्त मालमत्ता हस्तगतचे चौथे बक्षीस फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस नाईक तात्या कदम, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे, हनुमंत दडस, संजय देशमुख, उर्मिला पेंदाम, वैभव सूर्यवंशी, संजय अडसूळ, चालक पोलीस अंमलदार योगेश रणपिसे व मदने यांनी केली आहे. त्यांना संपूर्ण फलटण ग्रामीण पोलीस स्टाफचे सहकार्य लाभलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!